S M L

5 महिन्याच्या गर्भवती महिलेची हत्या, 12 तासांत आरोपीला अटक

Samruddha Bhambure | Updated On: Aug 21, 2015 02:42 PM IST

5 महिन्याच्या गर्भवती महिलेची हत्या, 12 तासांत आरोपीला अटक

21 ऑगस्ट : मुंबईजवळ नालासोपार्‍यात एका गर्भवती महिलेवर अतिप्रसंग करून तिला ठार केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. तिच्या अडीच वर्षांच्या मुलाचंही अपहरण करण्यात आलं होतं. गटकीदेवी देवशी असं या मृत महिलेचं नाव आहे. पोलिसांनी बारा तासांच्या आत या गुन्ह्याचा छडा लावला आणि मुलाचीही सुखरूप सुटका केली.

नालासोपारा पूर्व इथल्या हनुमाननगर परिसरात साई सहारा इमारतीत गुरुवारी दुपारी ही घटना घडली आहे. हे देवशी कुटुंब 6 महिन्यांपूर्वी या इमारतीत राहायला आले होते. मृत महिलेचे पती अंबालाल देवशी ज्वेलरीच्या कामासाठी बाहेर असताना ही घटना घडली. या दाम्पत्याला अडीच वर्षांचा मुलगा आहे. या मुलाच्या सुटकेसाठी आरोपींनी दीड लाख रुपयांची खंडणीही अम्बालाल यांना मागितली.

ही घटना घडताच पोलिसांनी वेगाने तपासाची चाकं फिरवली आणि 12 तासांच्या आत आरोपींना अटक केली. खून करण्यापूर्वी महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचं या आरोपींनी कबूल केलं आहे. पोलिसांनी अंबालाल यांच्या मुलाचीही सुखरूप सुटका केली आहे. पण, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 21, 2015 11:22 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close