S M L

औरंगाबादमध्ये छेडछाडीला कंटाळून तरुणीची आत्महत्या, आरोपीला अटक

Samruddha Bhambure | Updated On: Aug 21, 2015 03:21 PM IST

औरंगाबादमध्ये छेडछाडीला कंटाळून तरुणीची आत्महत्या, आरोपीला अटक

21 ऑगस्ट : सततच्या छेडछाडीला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या तरूणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी छेड काढणार्‍या तरूणाविरोधात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रुती कुलकर्णी, असं आत्महत्या केलेल्या तरूणीचं नाव आहे. या प्रकरणी स्वप्नील मणियार या तरूणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरूणीला आई वडिल नसल्याने ती सिडको परिसरातील आपल्या आजी अजोबांसोबत राहत होती. स्वप्नील मणियारचं श्रुतीवर एकतर्फी प्रेम होतं. गेल्या काही दिवसांपासून स्वनील मणियार तिची रोज छेड काढत होता. लग्न कर नाहीतर कुटुंबीयांना संपवीन अशी धमकी देत हा माथेफिरू आणि विकृत तरूण श्रुतीला सतत छेडायचा, अश्लील मेसेज पाठवायचा. याबाबत तिनं पोलिसांत तक्रारही दिली, मात्र तिला न्याय मिळाला नाही. या सततच्या छेडछाडीला कंटाळून अखेर दोन दिवसांपूर्वी श्रुतीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला तातडीने खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुदैर्वाने उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.

गेल्या महिन्याभरात छेडछाडीमुळे झालेली ही दुसरी आत्महत्या आहे. या घटनेने औरंगाबाद शहरातील महिला मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 21, 2015 01:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close