S M L

आला इजिप्तचा कांदा, शेतकर्‍यांचा होणार वांदा !

Sachin Salve | Updated On: Aug 22, 2015 01:10 PM IST

आला इजिप्तचा कांदा, शेतकर्‍यांचा होणार वांदा !

egpit onion3422 ऑगस्ट : बळीराजाच्या कांद्याला आताकुठे बरा भाव मिळू लागला होता पण तोच ग्राहक धार्जिन्या सरकारने कांद्याचे भाव पाडण्यासाठी थेट इजिप्तमधून कांदा आयात केलाय. जेएनपीटी बंदरात इजिप्तच्या कांद्याचं कंटेनर येऊन धडकलं आहे. आज इजिप्तचा 120 टन कांदा नवी मुंबईच्या जेएनपीटी बंदरात येवून पोहचलाय. हा कांदा आज दुपारीच एपीएमसी मार्केटमध्ये दाखल होईल. इजिप्त बरोबरच चीन आणि पाकिस्तानमधून ही कांदा आयात केला जाणार आहे.

कांद्याचा भाव आता 70 रुपये किलो इतका  गाठलाय. तर लासलगाव बाजार समितीत कांद्याला 5 हजार रुपये क्विंटल भाव मिळालाय. त्यामुळे शेतकरी सुखावले आहे. पण, आता हा आनंद जास्त काळ टिकणार नाही असं दिसतंय. सरकारने थेट इजिप्त, चीन आणि पाकिस्तानमधून कांदा आयात केलाय. या कांद्यामुळे बाजारात आवाक जास्त निर्माण होईल आणि कांद्याचे भाव पुन्हा कमी होईल त्यामुळे ग्राहकांना तर हा दिलासा तर आहेच पण शेतकर्‍यांना तोटा सहन करावा लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 22, 2015 01:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close