S M L

पवारांच्या कृपेने 800 कोटींची खैरात, बबनदादा शिंदेंची कबुली

Sachin Salve | Updated On: Aug 22, 2015 03:21 PM IST

पवारांच्या कृपेने 800 कोटींची खैरात, बबनदादा शिंदेंची कबुली

22 ऑगस्ट : राष्ट्रवादीच्या नेत्यांवर बोगस अनुदान लाटल्याचा आरोप नेहमीच होतो. पण ते सहसा सिद्ध होत नाहीत.. आता तर राष्ट्रवादीचे माढा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे यांनी फुशारकी मारण्याच्या नादात नुकसान भरपाईच्या नावाखाली कोट्यवधी बोगस अनुदान कसं लाटलं याची जाहीरसभेत एकप्रकारे कबुलीच देऊन टाकलीय.

एवढंच नाहीतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उल्लेख करत पवारसाहेबांमुळे ही खैरात मिळाली असा खुलासाही केला. निमित्त होतं उजनीतून पाणी सोडण्यासाठी केलेल्या आंदोलनाचं..गेल्या 18 तारखेला पंढरपूर -टेंभुर्णी रस्त्यावर भोसपाटी गावात हे रास्तारोको आंदोलन झालं. त्यावेळी आंदोलक शेतकर्‍यांसमोर भाषण ठोकताना बबनदादा शिंदे यांनी ही मुक्ताफळं उधळलीत.

काय म्हणाले बबनदादा शिंदे ?

"शासनाने आज अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. पवार साहेबांनी, आपण बघितलं गेल्यावर्षी गारपीट झाली...किती जणांची गारपीट झालती हो? पटवर्धन, कुरोली, देव्हरं या चार-दोन गावांत झालती. मिळाले किती जणांना पैसे? 85 कोटी रुपये पंढरपूर तालुक्याला मिळाले...!!! प्रत्येकाला गारपिटीचे पैसे मिळाले. दुष्काळाचे पैसे प्रत्येकाला मिळाले. 60 कोटी रुपये पंढरपूर तालुक्याला केवळ पवारसाहेबांमुळे मिळाले. बागा जळायला लागल्या, एकरी 30 हजार रुपये अनुदान दिलं..पैसे दिलं..तेल्या आला का नाही मला नाही माहिती ? पण पवारसाहेब शेतकर्‍यांच्या मागं उभे राहिले.आणि कोट्यवधी रुपये तुमच्यासाठी दिले."

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 22, 2015 03:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close