S M L

सोने, पैसे नव्हे तर मुंबईत चक्क कांद्याची चोरी!

Samruddha Bhambure | Updated On: Aug 23, 2015 01:28 PM IST

04TY_SMALL_ONIONS_1709114g

23 ऑगस्ट : कांद्याला सोन्याचे भाव आल्याने चोरट्यांनी आपला मोर्चा कांद्याकडे वळवला आहे. प्रतिक्षानगर मार्केटमधून चोरट्यांनी तब्बल 14 गोनी कांदा लंपास केली आहेत. त्यामुळे पोलीस सध्या कांदा शोधात आहेत.

मुंबईतल्या सायन इथल्या प्रतीक्षानगर मार्केचमध्ये आनंद नाईक यांचं गेल्या 15 वर्षांपासून कांदा-बटाट्याचं दुकान आहे. गेल्या महिन्या पासून कांद्याचे भाव दिवसेंदिवस वाढतच आहे 25 रुपये किलोचा हा कांदा आज 80 रुपये किलोवर गेला आहे. दुकानासमोर त्यांनी 35 गोणी कांदा साठवून ठेवला होता. त्यातला 14 गोणी कांदा चोरट्यानं पळवला. त्यांची एकूण किंमत 39 हजार रुपये असल्याचे व्यापार्‍याने सांगितलं. पोलिसांनी आधी हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं नाही.. पण कांद्याचा भाव लक्षात आल्यावर आता पोलीस या चोराला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

मुंबईसह राज्यभर कांद्याचे भाव हे गगनाला भिडले आहेत. बाजारात आज 70 ते 80 रुपये किलोला असलेला कांदा काही दिवसांत 100 रुपये किलो पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बाजारातील कांद्याचे भाव वाढलेले पाहून एकीकडे सर्वसामान्य लोक हैराण झाले आहेत, तर दुसरीकडे चोरट्यांनी मात्र कांद्याची झालेली दुप्पट भाववाढ लक्षात घेऊन चक्क कांद्यांचीच चोरी करायला सुरूवात केली आहे.

या प्रकरणी टिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांदा महाग झाल्याने घरफोड्या करणारे चोर आता कांदा चोरीच्या दिशेने वळलेले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 23, 2015 01:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close