S M L

मुंबईकरांनो, आता करा खुलमखुल्‍ला प्‍यार!

Samruddha Bhambure | Updated On: Aug 23, 2015 08:50 PM IST

मुंबईकरांनो, आता करा खुलमखुल्‍ला प्‍यार!

23 ऑगस्ट : मुंबई... धावणारं, गजबजलेलं आणि खचाखच गर्दीचं शहर... अशा शहरात प्रेमासाठी निवांत कोपरा मिळणं कठीणच... मग हॉटेल, पब, गार्डन, चौपाटी इतकंच नाही तर लोकलमध्येसुद्धा ही जोडपी दिसतात... पण अशा अनेक ठिकाणी या प्रेमी युगुलांना पोलिसांच्या दंडुकेशाहीला सामोरं जावं लागतं. पोलीस येतात आणि त्यांना हुसकावून लावतात. पण आता या प्रेमवीरांना कुणाला घाबरण्याची गरज नाही... कारण प्रेमी युगुलांना त्रास देऊ नका, असे आदेश थेट मुंबई पोलीस आयुक्तांनीच दिलेत. त्यामुळे आता मुंबईकर खुलमखुल्ला प्यार करायला मोकळे झाले आहेत.

6 ऑगस्ट रोजी पोलिसांनी अक्सा बीच, मड आयलँड आणि इतर हॉटेलवर कारवाई करत 64 जणांना अटक केली होती. सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह वर्तन केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला होता. मात्र, ही कारवाई पोलिसांच्या चांगलीच अंगलट आली. 'बंद खोलीआड एकांतामध्ये एक महिला आणि एक पुरुष परस्पर संमतीने कुठले संबंध ठेवत असतील तर त्यामुळे सार्वजनिक नीतीमत्तेला धोका कसा पोहचतो,' असा कायदेशीर प्रश्न कारवाई झालेल्या तरुण-तरुणींनी उपस्थित केला. परिणामी, मुंबई पोलिस आयुक्त राकेश यांनी संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. यातूनच त्यांनी पोलिसांना प्रेमीयुगुलांना त्रास देऊ नका, असे निर्देशही दिल्याची चर्चा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 23, 2015 08:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close