S M L

बंगळुरू बुल्सला लोळवत यू मुंबाने पटकावले प्रो कबड्डी लीगचे विजेतेपद !

Sachin Salve | Updated On: Aug 24, 2015 08:01 AM IST

बंगळुरू बुल्सला लोळवत यू मुंबाने पटकावले प्रो कबड्डी लीगचे विजेतेपद !

24 ऑगस्ट : अत्यंत अटीतटीच्या चित्तथरारक लढतीत यू मुंबाने बंगळुरू बुल्सला धोबीपछाड देत प्रो कबड्डी लीगचे विजेतेपद पटकावले आहे. प्रो कबड्डी लीगच्या या अजिंक्यपदाबरोबरच यू मुंबाने एक कोटी रुपये बक्षिसाची घसघशीत कमाई केली आहे.

प्रो कबड्डी लीगच्या दुसर्‍या हंगामाचं अजिंक्यपद यू मुंबाने पटकावलं. वरळीच्या एनएससीआयच्या इनडोअर स्टेडिअममध्ये रंगलेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात यू मुंबाने बंगळुरु बुल्सचा 36-30 असा पराभव केला. पहिल्या हंगामात यू मुंबाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. पण दुसर्‍या हंगामात यू मुंबाच्या खेळाडूंनी कमाल केली आणि विजय खेचून आणला. यू मुंबाच्या शब्बीर बापूने 36 व्या मिनिटांला बंगळुरु बुल्सच्या चार जणांना चकवून मिळवलेले तीन गूण निर्णायक ठरले आणि तिथेच सामन्याला कलाटणी मिळाली. यू मुंबाच्या या यशात शब्बीर बापूसह सिंहाचा वाटा होता विशाल माने आणि रिशांक देवडिगा यांचा...प्रो कबड्डी लीगच्या या अजिंक्यपदाबरोबरच यू मुंबाने एक कोटी रुपये बक्षिसाची घसघशीत कमाई केली आहे. या विजयानंतर यू मुंबाच्या खेळाडूंना जोरदार जल्लोष केला. या संपूर्ण सीझनमध्ये यू मुंबाच्या खेळाडूंनी दृष्ट लागण्यासारखा खेळ केला आहे. त्यामुळे स्पर्धा जिंकल्यानंतर खेळाडूंनी जोरदार जल्लोष केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 24, 2015 08:01 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close