S M L

आली लहर केला कहर, पोलिसांनी शेळीलाच लॉकअपमध्ये डांबलं !

Sachin Salve | Updated On: Aug 24, 2015 10:27 AM IST

आली लहर केला कहर, पोलिसांनी शेळीलाच लॉकअपमध्ये डांबलं !

24 ऑगस्ट : परभणी जिल्ह्यातल्या पाथरीमधलं पोलीस स्टेशन सध्या चर्चेचा विषय बनलंय. कारण इथल्या पोलिसांनी एका शेळीलाच तुरुंगात टाकलंय. गेले 2 दिवस ही शेळी लॉकअपमध्येच होती. एवढंच नाही तर कोठडीतच तिच्या चारापाण्याची व्यवस्था करण्यात आलीय. अखेर या शेळीला आता कोंडवाड्यात रवानगी करण्यात आलीये.

घडलेली हकीकत अशी की, परभणीच्या पाथरी शहरातल्या इंदिरानगर भागातून एक शेळी चोरट्यांनी पळवली होती. याबाबत शेळी मालक हिदायत खान यांनी पाथरी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार परभणीतून या शेळीसह एका आरोपीला पोलिसांनी पकडलं. आणि पोलीस स्टेशनमध्ये एका कोठडीत आरोपीला आणि दुसर्‍या कोठडीत चक्क या शेळीलाच डांबून ठेवलं. गेले दोन दिवस या शेळीच्या आवाजानं हे पोलीस स्टेशन चर्चेचा विषय बनलंय. येणारे जाणारेही या शेळीला बघून अचंबित होतायत. कुणीतरी लॉकअपमधल्या या शेळीचे फोटो काढून व्हॉट्सऍपवर टाकले. हे फोटो व्हायरल झाल्यानं जिल्हाभर याची चर्चा रंगलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 24, 2015 10:27 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close