S M L

गेला मान्सून कुणीकडे, सप्टेंबर महिनाही कोरडाच जाणार ?

Sachin Salve | Updated On: Aug 24, 2015 01:11 PM IST

गेला मान्सून कुणीकडे, सप्टेंबर महिनाही कोरडाच जाणार ?

24 ऑगस्ट : अख्खा ऑगस्ट महिना जवळपास कोरडाच गेला...आणि आता सप्टेंबर महिनाही तसाच जाण्याची चिन्हं आहेत. सप्टेंबर महिन्यात फक्त 84 टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय.

ऑगस्टमध्ये आतापर्यंत 90 टक्के पाऊस झालाय. हवामान खात्याची या अंदाजामुळे दुष्काळाच्या चिंतेत भर पडलीय. अगोदरच अपुर्‍या पावसामुळे बळीराजा हवालदिल झालाय. त्यातच पावसाचा शेवटचा महिना म्हणून बघितला जाणारा सप्टेंबर महिनाही कोरडा गेला, तर शेतीवर अस्मानी संकट येईल. दरम्यान, स्कायमेट या खासगी हवामान संस्थेनुसार येत्या काही दिवसांत थोडासा पाऊस पडेल, पण मुसळधार आणि सलग पावसाची शक्यता कमी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 24, 2015 01:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close