S M L

...तर रेशन दुकानावरही कांदा उपलब्ध करून देऊ -खडसे

Sachin Salve | Updated On: Aug 25, 2015 09:13 AM IST

khadse on aare 3425 ऑगस्ट : कांद्याने वांदा केल्यामुळे आता राज्य सरकारनेही कंबर कसलीये. गरज पडल्यास रेशन दुकानावरही कांदा उपलब्ध करून देऊ असं आश्वासन कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिलंय.

कांद्याची होत असलेल्या साठेबाजीवर सरकारने धडक कारवाई सुरू केलीये. मालेगाव आणि नाशिकमध्ये काही ठिकाणी साठेबाजी करणार्‍यांवर छापा घालण्यात आल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिलीय.

दरवर्षी कांद्याचे भाव वाढतात. पण कांद्याच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. बाहेरून कांदा आयात करण्यात आलाय. त्याचं व्यवस्थित वितरण झालेलं नाही.

पण गरज पडली तर रेशन दुकानावरही कांदा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू, असं आश्वासन खडसेंनी दिलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 25, 2015 09:13 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close