S M L

गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणार्‍या एसटीला टोल माफ

Samruddha Bhambure | Updated On: Aug 25, 2015 09:57 PM IST

गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणार्‍या एसटीला टोल माफ

25 ऑगस्ट : राज्य सरकारने गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणार्‍या एसटी गाड्यांना टोल माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोकणात गणेशोत्सवानिमित्त जाणार्‍या चाकरमान्यांना बाप्पा चांगलाच पावला आहे. गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणार्‍या एसटीच्या गाड्यांना टोल आकारला जाणार नसल्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली.

मुंबईतून कोकणात जाणार्‍या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर, सुरक्षित आणि जलद व्हावा, त्यांना गणेशोत्सवाचा पुरेपूर आनंद उपभोगता यावा या उद्देशाने सर्व यंत्रणांनी तत्पर सेवा द्यावी अशा सूचना सर्व विभागांना रावते यांनी दिल्या. तसंच याकाळात एसटी गाड्यांना टोलमधून वगळण्यात आल्याचे स्पष्ट केलं. मात्र, खासगी गाड्यांबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. गणेशभक्तांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये यासाठी कोकण मार्गात परिवहन खात्याची 16 पथके वाहतूक नियंत्रणासाठी ट्रॅफिक पोलिसांसोबत काम करतील, असंही रावतेंनी सांगितलं. हॉटेलच्या ठिकाणी पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होणार नाही याचीही काळजी घेतली जाणार असून राष्ट्रीय महामार्ग टोलमुक्त करण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 25, 2015 08:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close