S M L

लग्नाला नकार दिला म्हणून 'बसंती' चढली टाकीवर!

Samruddha Bhambure | Updated On: Aug 25, 2015 09:09 PM IST

लग्नाला नकार दिला म्हणून 'बसंती' चढली टाकीवर!

25 ऑगस्ट : बसंतीने आपल्याशी लग्न करावं म्हणून शोलेमधला वीरू पाण्याच्या टाकीवर चढला होता. पण चंद्रपूरमध्ये तर एक तरुणी बसंती होऊन पाण्याच्या टाकीवर चढली. प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने चंद्रपूरमधल्या एका मुलीने पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्येची धमकी दिली. चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूरमध्ये वेकोली कॉलनीमध्ये हा प्रकार घडला. तब्बल नऊ तास या 'बसंती'ची ड्रामेबाजी सुरू होती.

23वर्षांच्या या मुलीचं एका मुलावर पाच वर्षांपासून प्रेम आहे. गेल्या काही वर्षांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध आहेत. मात्र, प्रियकराने तिच्यासोबत लग्न करायला नकार दिला. यामुळे चिडलेल्या तरुणीने कॉलनीतील इमारतीच्या पाण्याच्या टाकीवर चढून सर्वांचे लक्ष वेधले. मुलाने लग्न करण्यास होकार दिल्यावरच आपण खाली उतरू, अशी धमकी तिने दिली. या घटनेमुळे परिसरात बघ्याचं चांगलंच मनोरंजन झालं. पण मुलगी टाकीवरून सुखरूप खाली उतरेपर्यंत बिचार्‍या पोलिसांचा जीव चांगलाच टांगणीला लागला होता.अखेर नऊ तासानंतर तिला पाण्याच्या टाकीवरून उतरवण्यात पोलीसांना यश आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 25, 2015 09:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close