S M L

चाऊस आणि चंद्रहारचा 'हिंद केसरी'वर बहिष्कार

25 डिसेंबर नुकत्याच पार पडलेल्या 'महाराष्ट्र केसरी' स्पर्धेत झालेल्या वादानंतर उपविजेता सईद चाऊस आणि दोनदा महाराष्ट्र केसरी राहीलेला चंद्रहार पाटील यांनी 'हिंद केसरी' स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. तर महाराष्ट्र केसरी विजय बनकरने पूर्ण तयारी न झाल्यामुळे या स्पर्धेत भाग न घेण्याचं ठरवलं आहे. प्रमुख मल्लांनी पाठ फिरवल्यानेप्रतिष्ठेच्या मानल्या जाणार्‍या या स्पर्धेत महाराष्ट्राल्या फक्त चार मल्लांची टीम सहभागी झाली आहे. पुण्यात पहिल्यांदाच 'महाराष्ट्र केसरी' स्पर्धा रंगली होती. त्यानंतर 'हिंद केसरी' स्पर्धा आयोजित करण्याचा मानही पुण्यालाच मिळाला. पुण्यातील लोणीकंदमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात हिंद केसरी स्पर्धा आयोजित करण्याची ही पहिलीचं वेळ आहे. मात्र महाराष्ट्रतील प्रमुख कुस्तीपटू सहभागी न झाल्याने कुस्ती प्रेमिंमध्ये निराशा आहे. 1951 मध्ये श्रीपती खंचनाळे यांनी पंजाबच्या बत्तासिंगला नमवत पहिल्यांदा हिंद केसरीचा मान महाराष्ट्राला मिळवून दिला होता. त्यानंतर हजरत पटेल, चंबा मुतनाळ, विजय चौगुले आणि योगेश दोडके यांनी महाराष्ट्राला हा मान मिळवून दिला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 25, 2009 09:52 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 25, 2009 09:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close