S M L

ऐश्वर्याचं कमबॅक, 'जज्बा'चा कडक ट्रेलर रिलीज

Sachin Salve | Updated On: Aug 26, 2015 12:21 PM IST

ऐश्वर्याचं कमबॅक, 'जज्बा'चा कडक ट्रेलर रिलीज

26 ऑगस्ट : बॉलीवूडची अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हीने मोठ्या विश्रांतीनंतर जोरदार कमबॅक केलंय. संजय गुप्ता दिग्दर्शित 'जज्बा' या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालंय. या सिनेमातून ऐश्वर्या रायने केलंय. या सिनेमात ऐश्वर्या एका महिला वकिलाच्या भूमिकेत आहे. आपल्या मुलीला वाचवण्यासाठी ती एका आरोपीची केस लढतेय. तर इरफान खान हा पोलीस अधिकार्‍याच्या भूमिकेत आहे.

दिग्दर्शक संजय गुप्तांनी या सिनेमाचा ट्रेलर ट्विटरवर प्रसिद्ध केलाय. त्यासोबतच या सिनेमाचे फोटोजही ट्विटरवरून शेअर करण्याचा सपाटा सुरू केलाय. विशेष म्हणजे, गेल्या अनेकवर्षांपासून ऐश्वर्या मोठ्या पडद्यापासून दुरावली होती. अभिषेक बच्चन याच्याशी लग्नानंतर ऐश्वर्याने कोणताही सिनेमा केला नव्हता. पण, आता प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर ऐश्वर्याने कमबॅक केलंय. येत्या 9 आॅक्टोबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 26, 2015 09:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close