S M L

बहिणीच्या खुनाच्या आरोपाखाली इंद्राणी मुखर्जीला अटक

Sachin Salve | Updated On: Aug 26, 2015 01:10 PM IST

बहिणीच्या खुनाच्या आरोपाखाली इंद्राणी मुखर्जीला अटक

26 ऑगस्ट : आयएनएक्स नेटवर्कची संस्थापक आणि स्टार इंडियाचे माजी सीईअो पीटर मुखर्जी यांची पत्नी इंद्राणी मुखर्जी हिला पोलिसांनी अटक केली आहे. इंद्राणीवर स्वतःची सख्खी बहीण शीना बोरा हिचा खून केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी इंद्राणी मुखर्जीला अटक केलीये. या अटकेमुळे कॉर्पोरेट क्षेत्रात एकच खळबळ उडालीये.

2012 पासून शीना बोरा गायब होत्या. गेल्या आठवड्यात पोलिसांना त्याबद्दल माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली. या प्रकरणातला दुसरा आरोपी आणि इंद्राणी मुखर्जीचा ड्रायव्हर श्याम राय याच्या तपासादरम्यान त्यानं गुन्ह्यात सहभागी असल्याचं कबूल केलं. या ड्रायव्हरनं शीनाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी इंद्राणीला मदत केल्याचं सांगितलं. श्याम रायच्या कबुलीवरुन पोलिसांनी मुखर्जीना ताब्यात घेतलंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही बहिणींमध्ये मालमत्ता आणि पैशांवरून वाद होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 26, 2015 09:22 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close