S M L

शीना वोरा बहिण नसून मुलगी, इंद्राणी मुखर्जींची धक्कादायक कबुली

Samruddha Bhambure | Updated On: Aug 26, 2015 07:33 PM IST

शीना वोरा बहिण नसून मुलगी, इंद्राणी मुखर्जींची धक्कादायक कबुली

26 ऑगस्ट : शीना वोरा हत्याप्रकरणाला आता एक नवं वळण आलं आहे. इंद्राणी मुखर्जी यांनी शीना वोरा ही आपली बहिण नसून मुलगी होती, असा धक्कादायक खुलासा पोलीस चौकशी दरम्यान केला आहे. तसंच शीना आपल्या पहिल्या पतीपासून झालेली मुलगी असल्याचंही इंद्राणी यांनी स्पष्ट केलं आहे. या प्रकरणाच्या पुढील चौकशीसाठी गुवाहटी, कोलकाता आणि पेण इथे तीन पथके रवाना करण्यात आली असून पोलिसांनी इंद्राणी यांचे पहिले पती संजीव खन्ना यांनाही कोलकाता इथून पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. मुंबई पोलिसांच्या टीमने ही कारवाई केली आहे.

2012मध्ये झालेल्या शीना वोराच्या हत्येप्रकरणी स्टार इंडियाचे माजी सीईओ पीटर मुखर्जी यांची पत्नी इंद्रायणी मुखर्जीला पोलिसांनी बहिणीच्या हत्येच्या आरोपाखाली काल रात्री अटक केली होती. या कारवाईने कॉर्पोरेट जगतात खळबळ उडाली असताना या हायप्रोफाइल 'मर्डर मिस्ट्रीचा हळूहळू उलगाडा होऊ लागलं आहे. वांद्र्याच्या कॉलेजसमोरुन शीनाचे अपहरण करून चालत्या गाडीतच गळा आवळून तिचा खुन करण्यात आला, अशी धक्कादायक माहिती तपासातून उघड झाल्याची सूत्रांची माहिती आहे. आपला ड्रायव्हर मनोहर रायच्या मदतीने इंद्राणीने शीनाचा खून केला असल्याचंही सांगण्यात येत आहे.

तीन वर्ष इंद्रायणीने हा खून लपवून ठेवला, पोलिसांना गुंगारा दिला, शीना बहिण आहे असं सर्वांना खोटं सांगितलं, मृतदेहाची विल्हेवाट लावली. पण, अखेर मनोहर राय पोलिसांच्या हाता लागला आणि एकामागून एक धक्कादायक खुलासे व्हायला सुरूवात झाली. नात्यांच्या, खासगी संबंधांच्या गुंतागुंतीमुळे इंद्राणीने मुलगी शीना बोराची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. तर शीना वोराचा भाऊ मिखील वोरा यांनं शीनाची हत्या पैशामुळे झाली नसल्याचा दावा केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 26, 2015 07:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close