S M L

लातूरमध्ये कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेनंतर महिलेचा मृत्यू

Sachin Salve | Updated On: Aug 27, 2015 03:54 PM IST

लातूरमध्ये कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेनंतर महिलेचा मृत्यू

27 ऑगस्ट : लातूर जिल्ह्यातल्या चापोली इथं कुटंुब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यानंतर रक्तस्त्राव होऊन शीतल हुले या महिलेचा मृत्यू झालाय. शीतलला तीन मुलं आहेत. त्यात दोन महिन्यांचं बाळही आहे. शीतलच्या नातेवाईकांनी डॉक्टराच्या हलगर्जीपणामुळेच आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप केलाय.

शीतल 25 तारखेला चापोली प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यासाठी दाखल झाली. डॉक्टर बेलखुठे यांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली. त्यानंतर संध्याकाळी 4 वाजता शस्त्रक्रिया संपली, पण शीतलची प्रकृती मात्र खालावल्याचं लक्षात आलं. तिला खूप सक्तस्त्राव होत होता. त्यानंतर अधिक उपचार करण्यासाठी शीतलला लातूरच्या सरकारी दवाखान्यात हलवण्यात आलं. पण उपचार सुरू असतानाच रात्री उशीरा तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सिव्हिल सर्जन आणि आरोग्य विभागाच्या पथकाने लातूरच्या शासकीय रुग्णालयात भेट दिली. पोस्टमॅार्टम रिपोर्ट आल्यानंतर यामागचं कारण कळेल असं सांगण्यात आलं. दरम्यान, या डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी महिलेच्या पतीने केलीये. पोस्टमार्टेम रिपोर्ट आल्यानंतर या घटनेमागचे सत्य बाहेर येईल ही मात्र तीन लहान चिमुकल्यांनी आता दाद कुठे मागावी ? त्याच्या आईने मुलाच्या संगोपणासाठी कुटुब नियोजनाची शस्त्रक्रीया करण्याचा निर्णय घेतला होता मात्र तोच निर्णय तिच्या कुटुंबियांसाठी घातक ठरलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 27, 2015 09:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close