S M L

नाल्याने अख्खा रस्ताच नेला खरडून !

Sachin Salve | Updated On: Aug 28, 2015 12:03 PM IST

नाल्याने अख्खा रस्ताच नेला खरडून !

28 ऑगस्ट : आपण अनेक वेळा पाहतो की रस्त्याखालून नाला वाहतो...नाल्यावर पूल असतो, त्यावरून आपण आपली गाडी नेतो. पण वर्ध्यातल्या सोनेगावमध्ये परिस्थिती थोडी वेगळी आहे. इथे नाल्यानं रस्ता खरडून नेलाय..एकेकाळी डांबरी रस्ता होता..आता तिथे काहीच नाही. त्यामुळे नदीपलीकडे ज्यांची शेती आहे, त्यांना आपल्या शेतात जाताच येत नाही. मोठी कसरत करत, जीव धोक्यात घालून जावं लागतंय.

वर्धा या जिल्हा मार्गाला जोडल्या गेलेल्या सोनेगांव (बाई) मार्गावरील भदाड़ी नाल्याच्या पाण्याने अख्खा रस्ताच खरडून नेला. त्यामुळ नदीपलीकडे शेती करणार्‍या शेतकर्‍यांना जाताच येत नाहीत. प्रशासनाकडे पुलाची मागणी केली असताना केवळ आश्वासन देऊन बोळवन करण्यात आलीत.

भदाडी नाल्यापलिकडे सोनेगांव, सिरसगाव, वायगाव शिवारातील शेतकर्‍यांची शेती आहेत. या शेतीवर जाण्यासाठी एकमेव असणारा मार्गाच खरडला आहेत. जनावर, वाहनं, बैलगाड़ी अपघातग्रस्त होत आहेत. मात्र प्रशासन आणि लोकप्रतिनिधीकडून 'बापजादे' पडले नाहीत आणि आता तुम्ही पडणार आहात काय असा सवाल केला जातोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 28, 2015 12:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close