S M L

शीना बोरा खूनप्रकरणी संजीव खन्नाची आज झाडाझडती

Sachin Salve | Updated On: Aug 28, 2015 01:24 PM IST

शीना बोरा खूनप्रकरणी संजीव खन्नाची आज झाडाझडती

28 ऑगस्ट : गेल्या तीन दिवसांपासून देशभरात खळबळ उडवून देणार्‍या शीना बोरा हत्याकांड प्रकरणी नवेनवे खुलासे समोर येत आहे. या प्रकरणी चौकशी सत्र सुरू आहे पण अजूनही गुढ उकलेलं नाहीये. शीनाच्या हत्येवेळी उपस्थित असलेला इंद्राणीचा दुसरा पती संजीव खन्नाची आज मुंबई पोलीस चौकशी करणार आहेत. त्याला कोलकत्यात अटक करण्यात आली होती. काल गुरुवारी त्याला मुंबईत आणलं गेलं. संजीव खन्ना काय कबुली देतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

अटकेत असणारे इंद्राणी आणि तिचा ड्राईव्हर शाम रॉय या दोघांनाही वांद्रे कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता आहे. तसंच इंद्राणीला आज तिच्या वकिलांना भेटण्याची परवानगी दिलीय. तर दुसरीकडे शीनाचा भाऊ मिखाईल यालाही गुवाहाटीतून मुंबईत आणण्यात आलंय, त्याची पोलीस कसून चौकशी करणार आहेत. आपल्याकडे अनेक गुपीतं असल्याचा दावा मिखाईलनं केला होता. शीनाचा प्रियकर आणि पीटर मुखर्जी यांचा मुलगा राहुल याची पोलिसांनी कसून चौकशी केली. विशेष म्हणजे यावेळी मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया हे या चौकशीदरम्यान स्वतः हजर होते.

शीनाच्या जन्म दाखल्यावर खोट्या सह्या

दरम्यान, आणखी एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. इंद्राणीनं शीना बोराच्या जन्म दाखल्यावर स्वतःच्या नावाचा उल्लेख न करता स्वतःच्या आई वडिलांचं नाव वापरलं होतं. स्वतःचे वडील उपेंद्र बोरा आणि आई दुर्गा बोरा हे शीनाचे आई-वडिल असल्याचा उल्लेख या जन्मदाखल्यावर आहे. इंद्राणीच्या नावाचा कुठेही उल्लेख नाही. मात्र, इंद्राणीचे वडील उपेंद्र बोरा यांनी आपण शीनाचे आजोबाच असल्याचं स्पष्ट केलंय. ज्याने शीनाच्या खोट्या सह्या केल्या होत्या, तो इंद्राणी मुखर्जीचाच कर्मचारी असल्याचं उघड झालंय. त्याने पोलिसांसमोर शीनाच्या सह्या केल्याची कबुली दिलीये.

शीनाच्या अवशेषांचा शोध

शीना बोरा हत्या प्रकरणात आता रायगड पोलीस गागोदे गावाजावळ शीनाच्या अवशेषांचा शोध घेत आहेत. शीनाला मारल्यानंतर याच ठिकाणी तिचा मृतदेह टाकला होता. शीनाचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत होता. रायगड पोलिसांचं विशेष पथक घटनास्थळी जाऊन आता अवशेषांचा शोध घेत आहेत.

खूनामागचा हेतू स्पष्ट - राकेश मारिया

शीना बोराच्या खुनामागे काय हेतू असावा याची आपल्याला पुरेशी स्पष्ट कल्पना आली आहे, असं मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी म्हटलंय. मारिया स्वतः या प्रकरणात लक्ष घालत आहेत आणि चौकशीमध्येही त्यांनी सहभाग घेतला आहे. काल रात्री त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यात आतापर्यंतच्या तपासाची माहिती दिली. मुंबई पोलीस आता संजीव खन्ना कोलकात्याहून येण्याची वाट बघत असल्याचं त्यांनी सांगितलं.

शीना इंद्राणीची मुलगी -पीटर मुखर्जी

दरम्यान, पीटर मुखर्जी यांनी निरनिराळ्या मीडियाला मुलाखती देण्याचा सपाटा कालही सुरुच ठेवला. CNN IBNला दिलेल्या मुलाखतीमध्ये पीटर मुखर्जीनं सांगितलं की, राहुल आणि शीना यांच्या प्रेमप्रकरणामुळे इंद्राणी नाराज होती. तसंच शीना आणि मिखाईल आपली भावंडं असल्याचा दावा इंद्राणीनं नेहमीच केला होता, असं पीटर यांनी म्हटलंय. तर दुसर्‍या मीडियाशी बोलताना त्यांनी मी इंद्राणीची बहीण नाही तर मुलगी आहे अशी माहिती शीना बोरानं आपल्याला दिली होती, असं म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 28, 2015 12:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close