S M L

कॉर्पोरेट जगात एका नात्याचा खून !

Sachin Salve | Updated On: Aug 28, 2015 02:40 PM IST

कॉर्पोरेट जगात एका नात्याचा खून !

चंद्रकांत फुंदे, मुंबई

28 ऑगस्ट : शीना बोरा हत्याकांड...तीन वर्षांनंतर एका मुलीच्या खुनाचा सुगाव लागतो आणि जो काही खुलासा झाला तो अत्यंत धक्कादायक आणि नात्याचा खून करणारा असाच आहे. इंद्राणी, तिची मुलं आणि तिचे नवरे यांच्यामधले अजीब रिश्ते...इंद्राणी मुखर्जीसारखी एक बाई एका मीडिया कंपनीचंी महाराणी कशी होते. कॉर्पोरेट जगताच्या शिड्या चढण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकते.. हेही यातून समोर आलंय.

खरंच कितने 'अजीब रिश्ते यहा पे'...असंच या शीना बोराच्या मर्डर मिस्ट्रीबाबत म्हणावं लागतंय...आता तुम्हीच बघाना....कॉर्पोरेट जगतात मोठं नाव कमावलेली ही इंद्राणी मुखर्जी स्वतःच्याच मुलीचा खून करेल असं कोणाला तरी वाटेल का पण दुदैर्वाने या कॉर्पोरेट जगतातलं हेच खरं वास्तव आहे....करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी ही इंद्राणी नावाची बाई लागोपाठ लग्न करत फिरते काय आणि त्यांचीच मुलं पुन्हा एकमेकांच्या पेमात पडतात काय....सगळंच कसं चक्रावून टाकणारं हे...

पोलीस आता इंद्राणीच्या सगळ्या नातेवाईकांची आणि तिच्या सगळ्या नवर्‍यांचीही चौकशी करतायत. इंद्राणीची 2 नाहीतर तब्बल 3 लग्न झालीयत. सिद्धार्थ दास हा इंद्राणीचा पहिला नवरा, संजीव खन्ना हा दुसरा नवरा आणि पीटर मुखर्जी हा तिसरा. सगळेच जण या कहाणीचे वेगवेगळे अँगल सांगतायत. अशातच आता शीनाचा गुवाहाटीतल सख्खा भाऊ मिखाईल बोराने तर आईला म्हणजेच इंद्राणीला माझाही काटा काढायचा होता असा सनसनाटी आरोप केलाय..

मिखाईल फक्त एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने आमचे खरे वडील नेमके कोण आहे हेही आम्हाला माहीत नाही, अशी उद्विग्न प्रतिक्रिया दिलीय...हे झालं मिखाईलचं...आता जरा पीटर फॅमिलीकडे वळूयात...पोलिसांनी शीनाचा प्रेमी कम सावत्रभाऊ म्हणजेच राहुल मुखर्जीची दिवसभरातून दोनदा चौकशी केली. त्यात त्याने शीना बेपत्ता झाल्यानंतर आपण पोलिसांत तक्रार देण्याचा प्रयत्न केला होता...पण तिसर्‍या दिवशी आपल्याला शीनाच्या मोबाईलवरून रिलेशन संपवायचे आहेत असा मेसेज आल्याचं पोलिसांना सांगितलं. याचाच अर्थ शीनाचा खून केल्यानंतरही इंद्राणीच तिचा मोबाईल आणि सोशल अकाऊंट्स ऑपरेट करत होती.

राहुल आणि शीनाच्या अफेअरसोबतच मायलेकीतला संपत्तीचा वाद हे देखील या खुनामागचं आणखी एक कारण सांगितलं जातंय. असं म्हणतात... इंद्राणीच्या संपत्तीवरच डोळा ठेऊनच शीनाने राहुल मुखर्जीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होतं म्हणे...कारण करिअरच्या नादात इंद्राणीनेे शीना ही आपलीच मुलगी असल्याचं पहिल्यापासूनच लपून ठेवलं होतं...त्याचाच बदला घेण्यासाठी शीनानेआपल्याच सावत्रभावालाच प्रेमाच्या जाळ्यात ओढून इंद्राणी मुखर्जीच्या संपत्तीवर दावा ठोकला होता म्हणे...आणि याच संपत्तीच्या वादातून इंद्राणीने शीनाचा काटा काढल्याचं बोललं जातंय. अर्थात ही देखील आणखी एक शक्यताच म्हणता येईल...दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार पोलीस या गुन्ह्यात इंद्राणीचा चालक श्याम रॉयला माफीचा साक्षीदार बनवण्याच्या तयारीत आहेत...बघुयात पुढे काय काय होतंय ते...

या मर्डर मिस्ट्रीचा घटनाक्रम

24 एप्रिल 2012 - काय घडलं त्यादिवशी ?

- इंद्राणीने शीनाला सकाळी 6:30 वा. फोन केला

- बांद्र्यामधल्या नॅशनल कॉलेजजवळ शीनाला बोलावून घेतलं

- इंद्राणी तिचा पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर श्यामवर राय यांच्यासोबत कारमध्ये होती

- शीना राहुलसोबत बांद्र्याला पोहोचली आणि एकटीच इंद्राणीला भेटली

- इंद्राणीने शीनाला कारमध्ये बसायला सांगितलं

- कारमध्ये मागच्या सीटवर संजीव खन्नाला पाहिल्यावर शीनाने कारमध्ये बसायला नकार दिला पण इंद्राणीने तिला कारमध्ये खेचलं

- शीनाचा कारमध्येच खून झाला. संजीव खन्नाने शीनाचे हात पकडले, ड्रायव्हरने पाय पकडले आणि इंद्राणीने शीनाचा गळा दाबला

- शीनाचा मृतदेह पेट्रोल टाकून जाळण्यात आला आणि तो खोपोली - पेण रस्त्यावर जंगलात टाकून देण्यात आला

शीनाच्या खुनानंतरचा दिवस

25 एप्रिल 2012

- राहुल मुखर्जीने शीनाच्या मोबाईलवर फोन केला पण फोन बंद होता

- राहुलने दोन दिवस वाट बघून खार पोलिसांकडे धाव घेतली

- खार पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे राहुल वरळी पोलिसांकडे गेला

- पोलिसांनी इंद्राणीला फोन केला तेव्हा इंद्राणीने त्यांना शीना अमेरिकेत असल्याचं सांगितलं

शीनाच्या खुनानंतरचे दिवस

26 एप्रिल 2012

- शीनाच्या फोनवरून राहुलला मेसेज आला.

- शीनाला त्याच्याशी असलेलं नातं संपवायचंय असा तो मेसेज होता.

- त्यानंतर राहुलने केलेले कॉल कुणीच उचलले नाहीत.

इंद्राणीचे नातेसंबंध

- इंद्राणीचं पहिलं लग्न - सिद्धार्थ दास - मिखाईल आणि शीना (2मुलं)

- दुसरं लग्न - संजीव खन्ना - विधी (मुलगी)

- इंद्राणीचे तिसरे लग्न - पीटर मुखर्जी

- पीटर मुखर्जी यांना पहिल्या पत्नीपासून - रॉबिन राहुलसह 2 मुलं

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 28, 2015 01:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close