S M L

कुंभमेळ्यामुळे भिवंडीत 50 हजार वेअर हाऊस 12 दिवस बंद

Sachin Salve | Updated On: Aug 28, 2015 02:11 PM IST

कुंभमेळ्यामुळे भिवंडीत 50 हजार वेअर हाऊस 12 दिवस बंद

28 ऑगस्ट : नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी जवळच्या 50 हजार वेअर हाऊस 12 दिवस बंद ठेवण्याचे आदेश ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहे. यानिर्णयामुळे वेअर हॉउस मालक, ट्रान्सपोर्टस आणि रोजंदारी कामगार प्रचंड नाराज आहेत.

नाशिकमध्ये होणार्‍या कुंभमेळ्यासाठी ठाणे, कोकण, गुजरात, आणि परदेशातूनसुमारे 25 लाख भाविक जाणार असल्याचा अंदाज पोलीस आणि जिल्हा प्रशासनाचा आहे. हे सर्व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 मार्गे नाशिकला जाणार आहे. त्यामुळे यामार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे हे लक्षात घेऊन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस प्रशासन आणि वाहतूक पोलीस यांनी मिळून 50 हजार वेअर हाऊस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला मात्र जर काही वाहतूक कोंडी झाली तर लोढा बिल्डर, भूमी बिल्डर आणि इतर लोकानी कुंभ मेळ्याच्या भाविकांची राहण्याची आणि जेवणाची सोय या मार्गावर केली आहे. सुमारे 5 लाख रोजंदारी, माथाडी आणि ट्रांसपोर्टर यांचा रोजगार अवलंबून आहे. त्यांना आता 12 दिवस वेतन मिळणार नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या यानिर्णयामुळे वेअर हाऊस मालक अडचणीत आले असून त्यानी याबाबत सरकारकडे विनंती केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 28, 2015 02:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close