S M L

विदर्भात उद्योग आणण्यासाठी उद्योगपतीचे पायही धरायला तयार -गडकरी

Sachin Salve | Updated On: Aug 29, 2015 09:17 PM IST

gadkari news29 ऑगस्ट : विदर्भातील बेरोजगारी दूर करण्यासाठी उद्योग आणणे आपले कर्तव्य आहे. विदर्भात उद्योग सुरू करण्यासाठी जर एखाद्या उद्योगपतीचे पायही धरावे लागले त्यासाठीही आपली तयारी आहे असं सांगत  केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्यावर उद्योगांचे प्रतिनिधी असल्याची टीका करणार्‍यांना आव्हान दिले. ते नागपूरमध्ये बोलत होते.

नागपूरमध्ये मिहान- रिलायन्स एरोस्ट्रक्चर लिमिटेडच्या जमीन हस्तांतरणचा कार्यक्रम पार पडला.यावेळी बोलतांना नितीन गडकरी यांनी विदर्भातील बेरोजगारी दूर करण्यासाठी उद्योग आणणे आपले कर्तव्य असल्याचं म्हटलंय. तसंच नागपुरात उद्योग आणण्यासाठी उद्योगपतींचे पायही धरण्यास तयार असल्याचं वक्तव्य करून टीकाकारांना आव्हानाच दिलंय.

या कार्यक्रमात अनिल अंबानी यांनी जगभरात अनेक देशांमध्ये नागपूरच्या मिहान प्रकल्पाचं मार्केटिंग केलंय. त्यामुळे ते मिहानचे ब्रँड ऍम्बॅसेडर असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

यावेळी बोलतांना अनिल अंबानी यांनी नागपूर ही टायगर कॅपिटल असल्याचा उल्लेख करत व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे दोन टायगर असल्याचा उल्लेख केला. मिहानमध्ये रिलायन्स एरोस्ट्रक्चर लिमिटेडला 289 एकर जागा हस्तांतरीत करण्यात आली. रिलायन्स या प्रकल्पासाठी 6500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या प्रकल्पामुळे जवळपास 15 हजार लोकांना रोजगार मिळणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 29, 2015 07:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close