S M L

औरंगाबादला दारा शिकोहचं नाव द्या - सदानंद मोरे

Samruddha Bhambure | Updated On: Aug 31, 2015 04:20 PM IST

औरंगाबादला दारा शिकोहचं नाव द्या - सदानंद मोरे

31 ऑगस्ट : औरंगाबादचं नाव बदलायचं असेल, तर दारा शिकोहचं नाव देण्यात यावं, असं मत 88 व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी मांडलं आहे.  दारा शिकोह हा औरंगजेबाचा मोठा भाऊ होता. पण तो धर्मनिरपेक्ष होता. त्यामुळे त्याचं नाव या शहराला देणं संयुक्तिक ठरेल, असं मोरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

केंद्र सरकारने नवी दिल्लीच्या औरंगजेब रोडचं नामकरण डॉ. अब्दुल कलाम रोड असं केल्यानंतर औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करायला हवं अशी मागणी शिवसेनेने केली आहे. या संदर्भात बोलताना मोरे म्हणाले, दारा शिकोह सर्वधर्म समभावाचा पुरस्कार करणारा होता. त्याने उपनिषधांचा अनुवादही केला होता. तो सर्व धर्मगुरुंशी त्याकाळी सातत्याने चर्चाही करायचा. त्यामुळे मी त्याचे नाव औरंगाबाद शहराला देण्याचा पर्यया सुचवतो आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 31, 2015 04:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close