S M L

ऊस उत्पादन आणि गाळपावर निर्बंध येण्याची शक्यता

Samruddha Bhambure | Updated On: Aug 31, 2015 09:05 PM IST

ऊस उत्पादन आणि गाळपावर निर्बंध येण्याची शक्यता

31 ऑगस्ट : राज्यातला वाढता दुष्काळ पाहता यंदाच्या वर्षी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या टंचाईग्रस्त भागात ऊस लागवड आणि गाळपावर देखील काही निर्बंध घालण्याचा सरकार गांभिर्याने विचार करतं आहे. राज्याचे कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनीच याबाबतचे स्पष्ट संकेत दिले आहेत. आधी ठिबक सिंचन करा, मगच ऊसाची लागवड करा, अशी कठोर भूमिका आगामी काळात राज्य सरकार घेण्याची शक्यता आहे.

राज्यात सध्या उस्मानाबाद, लातूर, बीड, अहमदनगर, सोलापूर, सांगली या जिल्ह्यातील अनेक गावांमधे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भीषण होत चालला आहे. त्यामुळे लोकांना आणि जनावरांना पिण्यासाठी प्रथम पाणी मिळावं, हा आमचा प्रयत्न असल्याचं एकनाथ खडसेंनी म्हटलं. तसंच या निर्णयाची अंमलबजावणी सर्वप्रथम दुष्काळी साखर पट्‌ट्यात करण्याचा सरकारचा मानस असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. पण जर याभागात पाऊस पडला तर ऊस लागवड आणि गाळपावरील निर्बंध मागे देखील घेते जाऊ शकतात, असंही खडसेंनी स्पष्ट केलं आहे.

'आधी ठिबक सिंचन, मगच ऊस लागवड' हा निर्णय खरंतर आघाडी सरकारनेच घेतला होता. आम्ही फक्त त्याची अंमलबजावणी करण्याचा विचार करत असल्याचा खुलासाही एकनाथ खडसेंनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 31, 2015 09:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close