S M L

मुख्यमंत्री आजपासून दुष्काळी दौर्‍यावर

Samruddha Bhambure | Updated On: Sep 1, 2015 08:29 AM IST

cm on media 345234

01 सप्टेंबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुष्काळ पाहणीसाठी आजपासून 3 दिवसांच्या मराठवाडाच्या दौर्‍यावर जाणार आहेत. या दौर्‍यात 5 जिल्ह्यांची पाहणी करणार आहेत. त्याआधी मुंबईत राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे. मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री मराठवाड्याकडे रवाना होतील.

यंदा पावसानं ओढ दिल्यानं राज्यात भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. या दौर्‍यादरम्यान, मुख्यमंत्री मराठवाड्यातील पीक परिस्थिती, चारा छावण्या, जलयुक्त शिवार अभियानाची कामं यांची ते पाहणी करणार आहेत. तसंच शासकीय यंत्रणेकडून सुरू असलेल्या मदतीच्या उपाययोजनांची ते माहिती घेणार आहेत. शेतकर्‍यांना कुठल्याही प्रकारे अनुदान कमी पडणार नाही आणि वेळ पडल्यास कर्जही काढू असं स्पष्टीकारण फडणवीस यांनी केलं आहे.

मुख्यमंत्री दुपारी 2 वाजता लातुरात आढावा बैठक घेणार आहेत. त्यानंतर शिरुर, अनंतपाळ, निलंगा, आणि औसा या तालुक्यांना भेट देऊन तिथल्या पिकांची पाहणी करतील. त्याचबरोबर चारा छावणी तसंच वनीकरण क्षेत्रास मुख्यमंत्री भेट देणार आहेत. त्यानंतर दिवसभराचा पाहणी दौरा पूर्ण करून मुख्यमंत्री रात्री आठच्या सुमारास उस्मानाबादला जिल्ह्यात आढावा बैठक घेणार आहेत.

मराठवाड्यासह इतर जिल्ह्यांमध्येही दुष्काळाची तीव्रता असल्यामुळे नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकर्‍यांच्याआत्महत्येचं सत्र सुरू आहे. अशात मुख्यमंत्री शेतकर्‍यांसाठी काय घोषणा करतील की नुसता दौरा करतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

मुख्यमंत्र्यांचा दौरा

  • 1 सप्टेंबर

- दुपारी लातूरमध्ये जिल्हा आढावा बैठक

- शिरूर अनंतपाळ, निलंगा आणि औसा तालुक्यांना भेट

- पीक परिस्थितीची पाहणी, चारा छावणी, वनीकरण क्षेत्राला भेट

- रात्री उस्मानाबादला जिल्हा आढावा बैठक

  • 2 सप्टेंबर

- उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा

- भूम आणि परांडा तालुक्यांची पाहणी

- पीक परिस्थिती, चारा छावणीची पाहणी

- वैरण विकास कार्यक्रमाचा आढावा

- जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत झालेल्या कामांची पाहणी

- जलप्रकल्पांनाही भेटी देणार

- बीड जिल्ह्यातल्या पाटोदा तालुक्याला भेट

- टंचाई निवारणाच्या उपाययोजनांची पाहणी

- रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी

- फळबागा लागवडीच्या कामांनाही भेटी

- संध्याकाळी उशिरा बीडमध्ये जिल्हा आढावा बैठक

  •  3 सप्टेंबर

- परभणी जिल्ह्याची पाहणी

- पाथरी, मानवत, गंगाखेड, पालम, परभणी तालुक्यांना भेट

- पीक परिस्थिती, जलयुक्त शिवार योजनेची कामे, चारा छावण्या इत्यादींची पाहणी

- दुपारी परभणीला जिल्हा आढावा बैठक

- संध्याकाळी नांदेडला देणार भेट

- लोहा तालुक्यातल्या उपाययोजनांची माहिती घेणार

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 1, 2015 07:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close