S M L

औरंगाबादचं नामांतरण हा पोरकटपणा -भालचंद्र नेमाडे

Sachin Salve | Updated On: Sep 1, 2015 05:20 PM IST

nemade3301 सप्टेंबर : औरंगाबादचे नामांतरण करण्याची मागणी करणारा विचार हा देशाची फाळणी करणार्‍या विचाराकडे घेऊन जाणारा आहे, अशी टीका ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी केली आहे. नामकरणासारख्या पोरकट विषयांवर वाद घालण्यापेक्षा देश विकासासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन नेमाडे यांनी केलंय.

भालचंद्र नेमाडे यांनी पत्रकार परिषद घेऊन औरंगाबादच्या नामकरणावर परखड मत व्यक्त केलं. सतीची चाल बंद करण्यामध्ये औरंगजेबाची मोठे योगदान आहे. त्यामुळे देशातल्या महिलांनी औरंगजेबाचे धन्यवादच द्यायला पाहिजे असंही नेमाडे म्हणाले.

मुस्लिम समाजातल्या अनेकांनी देशाच्या योगदानात मोलाची भुमिका बजावली आहे त्यामुळे नुसत्याच विरोध करणे अयोग असल्याचेही नेमाडे म्हणाले. विशेष म्हणजे, काल सोमवारी संत साहित्याचे अभ्यासक डॉ.सदानंद मोरे यांनी औरंगाबादला दारा शिकोहाचं नाव देण्यात यावं अशी भूमिका मांडली होती. त्यानंतर आज नेमाडे यांनी औरंगाबादाचं नामाकरण म्हणजे पोरकटपणा आहे अशी तोफ डागली.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 1, 2015 05:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close