S M L

जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना बुरशी लागलेलं आणि कुजलेलं धान्य !

Sachin Salve | Updated On: Sep 1, 2015 07:59 PM IST

जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना बुरशी लागलेलं आणि कुजलेलं धान्य !

01 सप्टेंबर : ग्रामीण भागातल्या मुलांना शिक्षणाची गोडी लागावी, पटसंख्या वाढावी यासाठी शालेय पोषण आहार योजना सुरू करण्यात आली. पण हिंगोली जिल्ह्यात मात्र याच योजनेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ होतोय.  अंतुले नगर भागातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत 526 विद्यार्थी आहेत. या शाळेला पोषण आहारासाठी बुरशी आलेली तूरडाळ, कुजलेला वाटाणा आणि माती मिसळलेला आळ्या लागलेला तांदूळ असं धान्य पुरवण्यात आलं आहे.

ग्रामीण भागातील शाळेत विद्यार्थी पट संख्या वाढावी आणि विद्यार्थ्यांना शिक्षणात गोडी लागावी, प्रकृती सुधारणा व्हावी यासाठी राज्य शासनांनी शालेय पोषण आहार योजना सुरू केली. ही योजना महाराष्ट्र को-ऑफ कन्झुमर फेडरेशन ली मुंबईव्दारे शाळेला पोषण आहार ,तांदूळ ,तुरडाळ ,तेल ,कांदा मसाला जिरे, मसुरदाळचा पुरवठा केला जातो.

अंतुलेनगर मधील जिल्हा परिषद शाळा या शाळेत 526 विद्यार्थ्यांची आहे. या शाळेतील विद्यार्थी शाळेतली खिचडी न खाता घरच जेवण पसंत करतात. वितरण करण्यात आलेल पोषण आहार निकृष्ट दर्जा असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. तुरडाळ भिजलेली असल्याने तुरडाळ वर बुरशी आली आहे. वाटाणा कुजलेला तर माती मिसळलेले तांदूळ आहे. या तांदळाला आळ्या लागल्या आहे,मसूर डाळ दोन महिन्यांपासून आलीच नाही.

आश्चर्याची बाब म्हणजे पोषण आहारात वापरले जाणारे मसाल्यांची मुदत तारीख निघून गेली आहे. दोन महिन्यांपासून मसूर डाळीच वितरण झालं नसल्याचं सांगण्यात आलंय. एकंदरीत असे म्हणावे लागेल की, हे धान्य माणसाचं काय तर प्राण्यांच्या ही खाण्याच्या दर्जाचे नाही. अशा परीस्थिती रोग प्रतिकारक क्षमता कमी असलेल्या लहान विद्यार्थ्यांना सडलेले धन्य पोषण आहाराच्या नावाने खायला देणे म्हणजे या चिमुक्ल्यावर एका प्रकारे अत्याचार करणं आहे.

याबद्दल सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापकांनी टाळाटाळ केली. नंतर हे धान्य खराब असल्याचं मान्य केलंय. प्राथमिक शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांनी शाळेत जाऊन पोषण आहार पाहणी केली. संबंधित ठेकेदारावर कारवाई करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 1, 2015 07:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close