S M L

शीनाचा खून केला नाही फक्त कटात सहभागी, इंद्राणीची कबुली

Sachin Salve | Updated On: Sep 2, 2015 01:47 PM IST

sheena bora case02 सप्टेंबर : शीना बोरा हत्येप्रकरणी अखेर इंद्राणी मुखर्जीने खुनाची कबुली दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. पण, आपण खुनाच्या कटात सहभागी होतो खून केला नाही असंही तिने सांगितल्याचं कळतंय. आज पीटर मुखजीर्ंची चौकशी होत आहे.

मुंबईतल्या खार पोलीस स्टेशनमध्ये ही चौकशी सुरू आहे.पीटर मुखर्जी हे शीनाचे सावत्र वडील आहेत.

काल मंगळवारी इंद्राणीनी या खुनात हात असल्याची कबुली दिलीय. लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे मी खून केलाय, असं तिनं म्हटलं नाहीय, तर खुनात हात असल्याचं म्हटलंय. पण त्याचवेळेला, तिचा मुलगा मिखाईलच्या हत्येचा कट मी रचला नाही, असा दावाही इंद्राणीनं केलाय. शीनाच्या खुनाची कबुली इंद्राणीचा आधीचा नवरा संजीव खन्ना यानं आधीच दिली होती. तिच्या ड्रायव्हरनंही सामिल असल्याचं मान्य केलं होतं. आता इंद्राणीनंही कबुली दिल्यामुळे पोलिसांची केस आणखी मजबूत झालीय. मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया हे स्वतः या तपासात लक्ष घालतायत. इंद्राणी मुखर्जी आणि संजय खन्नालाही खार पोलीस स्टेशनला आणण्यात आलंय.

आतापर्यंत कोणते पुरावे सापडले?

- इंद्राणीला दोन सुटकेस विकणार्‍याचा लागला माग

- एक सुटकेस इंद्राणीच्या घरातून जप्त

- मिखाईलची हत्या करून मृतदेहाची सुटकेसमधून विल्हेवाट लावण्याचा होता कट

- इंद्राणीचा आधीचा पती संजीव खन्नाची शीनाच्या हत्येत हात असल्याची कबुली

- शीनाच्या हत्येत हात असल्याची इंद्राणीच्या ड्रायव्हरची कबुली

- पोलिसांनी शीना बोराचा पासपोर्ट जप्त केला

- राजीनामा पत्रावर शीनाची खोटी सही असल्याची इंद्राणीच्या स्टाफची कबुली

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 2, 2015 01:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close