S M L

मराठवाड्याला हक्काचं पाणी मिळवून देणारच -मुख्यमंत्री

Sachin Salve | Updated On: Sep 2, 2015 10:02 PM IST

मराठवाड्याला हक्काचं पाणी मिळवून देणारच -मुख्यमंत्री

02 सप्टेंबर : मराठवाड्याला त्यांच्या हक्काचे पाणी आम्ही मिळवून देऊ आणि त्यासाठी लवकरच निर्णय घेतला जाईल असं भरीव आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (बुधवारी) उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांच्या दौर्‍याचा आजचा हा दुसरा दिवस होता. मुख्यमंत्र्यांनी भूममध्ये चारा छावणीला भेट दिली. तसंच तिथल्या शेतकर्‍यांशी संवाद साधला.

मुख्यमंत्र्यांनी आज उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील गावांची पाहणी केली. यावेळी त्यांनी कोरड्या ठाक पडलेल्या सीना-कोळेगाव धरणाचीही पाहणी केली. सौताडा, चुंबळी, थेरला येथेही काही पाणीसाठ्यांना भेट देऊन त्यांनी माहिती घेतली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, पाणी, चारा, काम यासंबंधी काही निर्णय आम्ही घेतले आहेत. हा दौरा पूर्ण झाल्यानंतर आणखी काही निर्णय आम्ही घेणार आहोत. मराठवाड्याला त्यांच्या हक्काचे पाणी आम्ही मिळवून देऊ आणि त्यासाठी लवकरच एका बैठकीचे आयोजन करण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. तसंच जिल्हा प्रशासनाला आवश्यक तिथं पाण्याचे टँकर आणि चारा छावण्या सुरू करण्याचे आदेशही दिले.

उस्मानाबादचा दौरा आटोपल्यानंतर मुख्यमंत्री पाच वाजेच्या सुमारात बीड जिल्ह्याच्याही दुष्काळ दौर्‍यावर रवाना झाले. तिथं त्यांनी पाटोदा तालुक्यातील सौताडा गावाला भेट दिली. तिथल्या पावसाअभावी जळालेल्या शेतीपिकांची आणि कोरड्या पडलेल्या विहिरींची पाहणी केली. यावेळी त्यांनी तिथल्या दुष्काळ पीडितांसोबतबही चर्चा केली. मुख्यमंत्र्यांचा आजचा मुक्काम हा बीडमध्ये असणार आहे. उद्या बीडचा दौरा आटोपल्यानंतर मुख्यमंत्री परभणी आणि नांदेडचाही दुष्काळ दौरा करणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 2, 2015 08:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close