S M L

बारामतीला दुष्काळाच्या झळा !

Sachin Salve | Updated On: Sep 3, 2015 08:48 PM IST

बारामतीला दुष्काळाच्या झळा !

baramati water issiue03 सप्टेंबर : मराठवाड्यावर तर दुष्काळाचं सावट आहेच. पण पश्चिम महाराष्ट्रातही काही ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे. बारामतीमध्ये सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. 30 हजार लोकसंख्येला फक्त 18 टँकरने पाणी पुरवठा होतोय.

बारामती तालुक्यातल्या लोणी भोपकर गावातल्या जिरायत भागात दुष्काळाची तीव्रता वाढू लागली आहे. या भागातली तब्बल 16 गावं आणि 57 वाड्या आणि रस्त्यांवरच्या 30 हजार लोकसंख्येसाठी केवळ 18 टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आलाय.

कधीतरी गावाला पाणी मिळेल या आशेवर कसंबसं इथले शेतकरी आणि गावकरी जगतायत. त्यातच हा भाग नेहमीच पाण्यापासून वंचित असल्यानं पाण्यासाठी भटकायचं तरी कुठे, असा सवाल या भगातले शेतकरी करतायत. पडेल त्या पावसावर होतील तशी पिकं घेवून शेतकरी शेती करतायत.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 3, 2015 08:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close