S M L

अभिनेते रणजीत यांच्या फार्महाऊसजवळ सापडले होते 6 मृतदेह

Sachin Salve | Updated On: Sep 4, 2015 01:51 PM IST

अभिनेते रणजीत यांच्या फार्महाऊसजवळ सापडले होते 6 मृतदेह

04 सप्टेंबर : शीना बोराच्या हत्येचं प्रकरण गाजत असतानाच आता शीनाच्या मृतदेहाचे अवशेष पेणमध्ये ज्याठिकाणी सापडला तिथल्या जागेचं गूढ वाढलंय.

पेणमध्ये 1986 ते 1992 दरम्यान 6 फार्महाऊस कर्मचार्‍यांचे मृतदेह सापडले होते. हे फार्महाऊस त्यावेळी बॉलीवूडचा व्हिलन रणजीत याच्या मालकीचे होते.

पण या 6 मृत्यूप्रकरणी केवळ प्राथमिक चौकशीच्या पलीकडे काहीच प्रगती झाली नव्हती. आता रायगड पोलीस 30 वर्षांपूर्वीच्या या गृढ मृत्यूचा पुन्हा तपास करणार आहेत. गावडे गावात हे फार्महाऊस आहे. शीनाच्या मृतदेहाचे अवशेष ज्याठिकाणी सापडले, तिथून हे गाव 3 किलोमीटर अंतरावर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 4, 2015 01:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close