S M L

नागपूर पालिकेकडे कर्मचार्‍यांसाठी पैसे नाही, समारोहासाठी 50 लाखांची उधळण !

Sachin Salve | Updated On: Sep 4, 2015 06:45 PM IST

नागपूर पालिकेकडे कर्मचार्‍यांसाठी पैसे नाही, समारोहासाठी 50 लाखांची उधळण !

04 सप्टेंबर : आर्थिकदृष्ट्या अत्यंत डबघाईला आलेल्या नागपूर महानगर पालिकेकडे कर्मचार्‍यांचे पगार देण्यासाठी पैसै नसतांना दुसरीकडे महापालिकेच्या 151 वर्ष पुर्णत्व समारोहासाठी 50 लाख खर्च करण्यात येत आहे. पालिकेकडे कर्मचार्‍याचा पगार देण्यासाठी पैसे नाही मग समारोहासाठी 50 लाख आले कुठून असा प्रश्न कर्मचारी विचारत आहे.

गेल्या दोन महिन्यापासून महापालिका कर्मचार्‍यांना पगार नाही. शहरातील रस्ते आणि सार्वजिनक सोयीचा अभाव आहे तर दुसरीकडे असे पैसे खर्च करण्यात येत आहेत. 14 सप्टेंबर रोजी मानकापुर स्टेडियम येथे होणार्‍या या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी येणार आहेत. यापुर्वी नागपूर महोत्सवानिमित्त आशा भोसले यांच्या गायनाच्या कार्यक्रमासाठी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च केले होते. आपल्या कर्मचार्‍यांना पगार देण्यासाठी पालिका गेल्या दोन महिन्यापासून टाळाटाळ करत आहे. अचानक समारोहाच्या कार्यक्रमासाठी थोडेथोडके नव्हे तर 50 लाख कुठून आले असा सवाल कर्मचार्‍यांनी उपस्थित केलाय. महापालिकच्या या निर्णयाचा सर्व स्तरातून निषेध होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 4, 2015 06:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close