S M L

संगीतकार आदेश श्रीवास्तव काळाच्या पडद्याआड

Sachin Salve | Updated On: Sep 5, 2015 01:23 PM IST

संगीतकार आदेश श्रीवास्तव काळाच्या पडद्याआड

५ सप्टेंबर : सुप्रसिद्ध संगीतकार आदेश श्रीवास्तव यांचं  निधन झालं. ते  वर्षाचे होते. आदेश श्रीवास्तव यांना मागील काही वर्षांपासून कँन्सरने ग्रासलं होतं. त्यांच्यावर अंधेरी येथील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दीड महिन्यांपासून उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला.

आदेश श्रीवास्तव यांचा कॅन्सर तिसर्‍या स्टेजपर्यंत पोहोचला होता. काही दिवसांपासून डॉक्टरांनी किमोथेरपी थांबवली होती, कारण आदेशचं शरीर किमोला प्रतिसाद देत नव्हतं. गेले अनेक दिवस ते अत्यवस्थ होते. त्यांना 2010 सालीही कॅन्सर झाला होता, उपचारानंतर तो बरा झाला, आणि दोन महिन्यांपूर्वी त्यांना पुन्हा त्रास होऊ लागला. त्यांना कॅन्सर रिलॅप्स झाल्याचं निदान झालं.

गाणी संगीतबद्ध करण्याबरोबरच आदेश पार्श्वसंगीतही द्यायचे..'बॉर्डर' या सुपरहिट सिनेमाचं पार्श्वसंगीत आदेश यांचंच होतं. 90 आणि 2000च्या दशकातले अनेक हिट सिनेमे त्यांच्या नावावर आहेत. ‘चलते चलते’, ‘बाबुल’, ‘बागबान’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘राजनीति’ ‘देव’ यासरख्या जवळजवळ १०० चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. तसंच लोकप्रिय 'झी सारे गम प' या कार्यक्रमात ते जज च्या भूमिकेत सहभागी होते. या व्यतिरिक्त त्यांनी अनेक अल्बम्सही केले. आदेश श्रीवास्तव यांच्या पार्थिवावर आज दुपारी ओशिवारा स्मशान भूमीत अंत्य संस्कार करण्यात येणार आहेत. आदेश श्रीवास्तव यांच्या निधनामुळे बॉलीवूडवर शोककळा पसरलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 5, 2015 10:12 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close