S M L

महानंदचं संचालक मंडळ होणार बरखास्त

Sachin Salve | Updated On: Sep 5, 2015 02:29 PM IST

महानंदचं संचालक मंडळ होणार बरखास्त

05 सप्टेंबर : गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे वादात सापडलेले राज्य सरकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच महानंदचे संचालक मंडळ बरखास्त होणार आहे. येत्या दोन-तीन दिवसांत ही कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा महसूल आणि दुग्धविकास मंत्री एकनाथ खडसे यांनी केलीय.

खडसे यांच्या घोषणेपूर्वीच महानंदच्या अध्यक्ष वैशाली नागवडे यांनी दिलेला राजीनामा संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. महानंदच्या संचालक मंडळावर गैरव्यवहाराचे गंभीर आरोप होते. या आरोपांची सक्षम यंत्रणेकडून चौकशी करण्यात आलीय. आणि त्यात तथ्य असल्याचं समोर आलंय. त्यामुळे येत्या दोन-तान दिवसांत संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 5, 2015 01:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close