S M L

कोल्हापुरातली घंटा नसलेली शाळा बंद !

Sachin Salve | Updated On: Sep 5, 2015 09:47 PM IST

कोल्हापुरातली घंटा नसलेली शाळा बंद !

kol school05 सप्टेंबर : शाळा म्हटलं की विद्यार्थ्यांना ओढ असते ती शाळेच्या घंटेची...पण कोल्हापूर जिल्ह्यात बिन घंटेची शाळा तयार झाली आणि या शाळेत सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत विद्यार्थी येऊ लागले..पण आता याच बिन घंटेच्या शाळेला आता कुलुप लागलंय. त्यामुळं शिक्षण खात नेमकं करतं काय असा सवाल उपस्थित केला जातोय.

कोल्हापूर जिल्ह्यातल्या भुदरगड तालुक्यातल्या शिंदेवाडीमध्ये ही बिनघंटेची शाळा होती. या शाळेचा राज्यस्तरावरही कौतुक केलं गेलं. इतकचं काय इथल्या शिक्षकांना इतर जिल्ह्यात जाऊन त्यांनाही या शाळेबद्दल माहिती देण्यास सांगण्यात आलं.

पण स्थानिक वाद आणि मुख्याध्यापिकांविरोधतल्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी यामुळं गेल्या 14 दिवसांपासून ही शाळा बंद आहे. शाळेला कुलुपचं लावण्यात आलंय. त्यामुळं विद्यार्थ्यांची परवड होऊन शैक्षणिक नुकसानही होत आहे.

पंतप्रधानांचा शिक्षक दिनाचा कार्यक्रम तर या विद्यार्थ्यांनी एका घरात जाऊन पाहिलं. आदर्श शाळा म्हणून या शाळेचा गौरव करण्यात आला होता. पण आता हीच शाळा बंद असल्यानं विद्यार्थ्यांच्या होणार्‍या नुकसानीला जबाबदार कोण असा सवाल विचारला जातोय. त्यामुळं जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासन यामध्ये लक्ष घालतं का हाच खरा प्रश्न आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 5, 2015 07:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close