S M L

उस्मानबादमधील वाटमारीतल्या खर्‍या आरोपीला अटक

30 डिसेंबर उस्मानाबादमधील भूम तालुक्यातल्या वुळूक इथे 17 डिसेंबरला झालेल्या वाटमारीतल्या आरोपींना पोलिसांनी पकडलंय. या आरोपीकडून 1 लाख रोख आणि लुटीतील दागिने हस्तगत केले आहेत. याच लुटमारीचा संशय घेऊन राकेश पवार या पारधी समाजातील एका मुलाची गावकर्‍यांनी दगडाने ठेचून हत्या केली होती. या प्रकरणातले खरे आरोपी सापडल्याने या प्रकरणानं नवं वळण घेतलंय. या मारहाणीत रोकेश आईही जबर जखमी झाली आहे. तीच्यावर उस्मानाबादेत उपचार चालु आहेत. राकेश पवार या वाटमारीत नव्हता, गुन्हा घडला त्या दिवशी तो यमगरवाडीच्या आश्रम शाळेत हजर होता हे आयबीएन-लोकमतने आधीच सिध्द केल होतं. राकेश पवार याच्या खून प्रकरणी आणखी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. केवळ वाटमारीच्या संशयावरुन राकेशला ठेचुन मारणार्‍या अकरा आरोपींवर पोलिसांनी सदोष मनुष्य वधाच्या गुन्हा नोंदविला आहे. या हत्या प्रकरणात भटके विमुक्त आयोगाचे अध्यक्ष बाळकृष्ण रेणके यांनी आणि लेखक लक्ष्मण गायकवाड यांनीही भेट दिली. लक्ष्मण माने यांनीही या प्रकरणी आंदोलन छेडण्याचे जाहीर केल आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 30, 2009 01:48 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 30, 2009 01:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close