S M L

मुंबईत ८ दिवस मांस विक्रीवर बंदीचा भाजपचा प्रयत्न फसला

Sachin Salve | Updated On: Sep 7, 2015 08:47 PM IST

मुंबईत ८ दिवस मांस विक्रीवर बंदीचा भाजपचा प्रयत्न फसला

07 सप्टेंबर : मिरा भाईंदरमध्ये मांस विक्रीवर बंदीनंतर मुंबईतही जैन पर्युषण काळात 10 दिवस मांसविक्रीवर बंदी घालण्याचा भाजपचा प्रयत्न फसलाय. मुंबई महापालिका क्षेत्रात आठ दिवस मांसविक्री वरच्या बंदीवरून आता भाजपनं घूमजाव केलंय. आता जैन धर्मियांच्या पर्युषण काळात चारच दिवस ही बंदी राहणार आहे. दरवर्षीप्रमाणे ही बंदी घालण्याचा प्रस्ताव थेट महापालिका आयुक्तांकडे पाठवण्यात आलाय. प्रथेप्रमाणे या प्रस्तावाला आयुक्तांनी मंजुरी दिल्याचंही सूत्रांनी सांगितलंय.

मिरा भाईंदर पालिकेत पर्युषण सप्ताहामुळे आठ दिवस मांस विक्रीवर बंदी घालण्यात आलीये. जैन धर्मिय या महिन्यात 11 ते 28 या दरम्यान पर्युषणाचे उपवास करतात. त्यामुऴे या दरम्यान मास विक्रीस बंदी घालावी, असा प्रस्ताव सत्ताधारी भाजपने मांडला आणि तो मंजूरही झाला. त्यानंतर मुंबईतही आठ दिवस मांस विक्रीवर बंदी घालण्याची मागणी भाजपने केली.

भाजपने अगोदर आठ दिवस बंदी घालण्यासाठी परिपत्रक प्रसिद्ध केलं. हा प्रस्ताव मुंबईत पालिकेच्या सभागृहात मांडण्याचा भाजपचा मानस होता. पण असा प्रस्ताव मांडला असता तर विरोधकांनी या प्रस्तावावर मोठा गोंधळ घातला असता. त्यामुळे भाजपची नाचक्की झाली असती. त्यामुळेच भाजपचे नेते अतुल भातखळकर आणि आमदार राज पुरोहित यांनी पर्युषणादरम्यान मंुबईत तीन दिवस मांस विक्रीवर बंदी घालण्याची मागणी पालिका आयुक्तांकडे केली. दरवर्षीप्रमाणे जैन पर्युषण काळात तीन ते चार दिवस बंदी घालण्याची प्रथा आहे. त्यानुसारच आयुक्तांनी भाजपचा हा प्रस्ताव मंजूर केला. या कार्यकाळात बंदी न घालता केवळ चार दिवस बंदी घालण्यासाठी परवानगी दिलीये.

दरम्यान, मांस विक्री बाबतीत निर्णय घेण्याचा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थाचा आहे. त्यात हस्तक्षेप करणार नाही असं सांगत दुग्धविकास आणि पशूसंवर्धन मंत्री एकनाथ खडसेंनी हात वर केले. जैन धर्मियांच्या पर्युषण पर्वाच्या निमित्ताने मांस विक्रीवर बंदी घालण्याचा डाव यानिमित्ताने भाजपचा डाव उघड पडलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 7, 2015 05:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close