S M L

अखेर वरुणराजे बरसले, शेतकरी सुखावले

Sachin Salve | Updated On: Sep 7, 2015 11:28 PM IST

अखेर वरुणराजे बरसले, शेतकरी सुखावले

07 सप्टेंबर : दुष्काळी झळाने होरपळणार्‍या विदर्भ आणि मराठवाड्यावर वरुणाराजाने अखेर कृपादृष्टी टाकलीये. मान्सून आता परतीच्या वाटेवर निघालाय. जाता जाता परतीच्या पावसानं दुष्काळात होरपळणार्‍या मराठवाड्याला काहीसा दिलासा दिलाय. आज (सोमवारी) विदर्भ, मराठवाड्यात पावसाने हजेरी लावली. उस्मानाबाद,लातूर आणि हिंगोलीमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. मात्र, आणखी जास्त पाऊस व्हायला हवा, अशी अपेक्षा तिथले नागरिक आणि शेतकरी व्यक्त करत आहेत.

लातुरात पावसाची हजेरी

पावसाळा संपत आला तरी लातूर जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली होती, मात्र आज दुपारी तब्बल दोन तास लातूर जिल्ह्यात पाऊस झाल्याने पुन्हा एकदा सुखावलाय. दुपारी 4 च्या सुमारास पावसाने लातूर शहरात आणि जिल्ह्यातल्या उदगीर आणि जळकोट तालुक्यात दमदार हजेरी लावली. जिल्ह्यातल्या इतर ठिकाणी देखील थोड्याफार प्रमाणात पावसाने हजेरी लावली असून या पावसाने बळीराजाच्या अशा पुन्हा उंचावल्या आहेत. जिल्ह्यातल्या सर्वच ठिकाणी पाऊस पडला नसला तरी येत्या काळात पाऊस येईल आणि पाण्याचा प्रश्न सुटेल हि अपेक्षा मात्र वाढली आहे.

वर्धा -नागपुरात परतीचा पाऊस

विदर्भातल्या वर्धा आणि नागपुरातही परतीच्या पावसानं हजेरी लावली. तब्बल 15 दिवसांनी पावसानं हजेरी लावल्यामुळे नागरिक सुखावलेत. मराठवाड्यातल्या दक्षिण भागात म्हणजेच उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड या जिल्ह्यांवर पावसाचे गडद ढग दाटले आहेत. तसंच हे ढग पुढच्या काही तासांमध्ये उत्तरेकडे म्हणजे, जालना, हिंगोली, परभणी, औरंगाबाद, तसंच नगर आणि नाशिकच्या दिशेनं सरकतील असा अंदाज वेधशाळेनं व्यक्त केलाय. त्यामुळे येत्या 24 तासांमध्ये संपूर्ण मराठवाड्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तब्बल एका महिन्यानंतरहिंगोलीत पाऊस

हिंगोली शहरासह जिल्ह्यात वसमत,औंढा सेनगाव,कळमनुरी भागात विजेच्या ठिकाणी कडकडाटा सह मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे खरीप पिकातील सोयाबीन,तूर,कापूस या पिकांना काही प्रमाणात का होईना पण फायदा होणार असल्यामुळे बळीराजा सुखावला आहे. गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या हिंगोलीकरांना पावसाने दिलासा दिला.पाऊस पडल्याने तेथे गारवा निर्माण झाला होता. आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते, दुपारी मात्र पावसाला दमदार सुरुवात झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 7, 2015 08:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close