S M L

कल्याण-डोंबिवली पालिकेतून 27 गावं पुन्हा वगळली

Sachin Salve | Updated On: Sep 7, 2015 09:59 PM IST

कल्याण-डोंबिवली पालिकेतून 27 गावं पुन्हा वगळली

07 सप्टेंबर : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत याच वर्षी एक जून रोजी समाविष्ट झालेली 27 गावं पुन्हा महापालिकेतून वगळण्यात आलेली आहेत. या सत्तावीस गावांची आता वेगळी नगरपालिका करण्यात येणार आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय घेऊन भाजपने शिवसेनेला शह दिल्याची चर्चा आहे.

गेल्यावर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये याच महापालिका हद्दीत भाजपला शिवसेनेच्या तुलनेत चांगल्या जागा मिळाल्या. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुका युती न करता स्वतंत्रपणे लढवाव्यात असा स्थानिक भाजप नेत्यांचा सूर आहे. यामुळेच भाजपच्या स्थानिक नेत्यांनी 27 गावांच्या संघर्ष समितीला साथ दिली आणि त्या गावांना महापालिकेतून वगळण्याचा निर्णय भाजपने घेतला असं बोललं जातंय.

1983 ला 27 गावांचा मनपात समावेश झाला होता. मात्र, 20 वर्ष आंदोलन करून 2002 साली गावांना वगळून 2003 पासून ग्रामपंचायती स्थापन करण्यात आल्या होत्या. त्यानंतर, सप्टेंबर 2006 पासून या गावांना एमएमआरडीएकडे सुपूर्द करण्यात आले. अखेर, 1 जून 2015 रोजी पुन्हा गावांचा समावेश महापालिकेत करण्यात आला. मात्र, समितीचा विरोध कायम होता. काही गावकर्‍यानी याविरोधी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. 3 सप्टेंबरला न्यायालयाने सरकारला तातडीने अहवाल सादर करण्याचा आदेश दिला. शनिवारी मुख्यमंत्री ठाण्यात आले होते. त्यांच्या भेटीत हा निर्णय झाल्याचे समजते.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 7, 2015 09:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close