S M L

शीना बोरा, इंद्राणी आणि सिद्धार्थ दासचीच मुलगी !

Sachin Salve | Updated On: Sep 7, 2015 11:20 PM IST

शीना बोरा, इंद्राणी आणि सिद्धार्थ दासचीच मुलगी !

07 सप्टेंबर : शीना बोरा आपली बहिणी असल्याचा बनवा करणार्‍या इंद्राणी मुखर्जीचा बुरखा आता खर्‍या अर्थाने फाटलाय. फॉरेन्सिक विभागाच्या अहवालामध्ये शीना बोरा इंद्राणी आणि सिद्धार्थ दासचीच मुलगी असल्याचं स्पष्ट झालंय. इंद्राणीने अगोदरच शीना आपली मुलगी असल्याचं मान्य केलं होतं. पण आता फॉरेन्सिक रिपोर्टमुळे पोलिसांचा मार्ग आणखी मोकळा झालाय.

रायगडमध्ये सापडलेले मृतदेहाचे अवशेष शीना बोराचेच असल्याचं फॉरेन्सिक विभागाच्या अहवालात स्पष्ट झालंय. शीना बोराच्या

अवशेषाचे डीएनए सिद्दार्थ दास आणि मिखाईल बोराच्या डीएनएशी जुळलेत. मिखाईल बोरा आणि शीना बोरा हे दोघेही सिद्धार्थ दास यांचीच मुले असल्याचं सिद्ध झालंय. इंद्राणीच्या डीएनएशी ते जुळले आहे. दरम्यान, इंद्राणी मुखर्जी आणि ड्रायव्हर शाम राय यांची पोलीस कोठडी आज संपली. त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आलीय. सध्या मुखर्जीच्या मालमत्तेसंबंधीचा तपास सुरू आहे, देशातल्या आणि परदेशातल्या मालमत्तेची चौकशी सुरू आहे अशी माहिती पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 7, 2015 11:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close