S M L

मुख्यमंत्री आजपासून पाच दिवस जपान दौर्‍यावर

Samruddha Bhambure | Updated On: Sep 8, 2015 01:08 PM IST

मुख्यमंत्री आजपासून पाच दिवस जपान दौर्‍यावर

08 सप्टेंबर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोयासान विद्यापीठातील पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण, तसंच इतर विविध औद्योगिक, आर्थिक संबंधी कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील एक शिष्टमंडळ आज (मंगळवारी) सकाळी 11 वाजता जपान दौर्‍यासाठी रवाना होणार आहे.

महाराष्ट्रात गुंतवणूक आणणं आणि पर्यटनाचा प्रचार करणं, हे या दौर्‍याचे प्रमुख उद्देश आहे. मुख्यमंत्र्यांसह या शिष्टमंडळात उद्योगमंत्री सुभाष देसाई, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांचा समावेश आहे. या शिवाय टोकियोमध्ये होणार्‍या पायाभूत सुविधांबाबतच्या बैठकींसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी आणि एमएमआरडीएचे आयुक्त युपीएस मदान उपस्थित राहणार आहेत.

या महत्त्वपूर्ण दौर्‍यात कोयासान विद्यापीठात उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम 10 सप्टेंबरला पार पडणार आहे. याच कार्यक्रमात कोयासान विद्यापीठ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठादरम्यान सामंजस्य करार होणार आहे. तसंच मुंबई ट्रान्सहार्बर लिंक (एमटीएचएल) आणि मेट्रो प्रकल्पांसाठी जपानच्या व्यापार आणि आर्थिक व्यवहारविषयक विभागाशी राज्य शासनाचा करार होणे अपेक्षित आहे. जपानचे पंतप्रधान शिंझो ऍबे यांच्याशीही ते चर्चा करतील.

दौर्‍यात नेमकं काय करणार?

- वाकायामा शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं उद्घाटन

- जपानी नागरिकांमध्ये महाराष्ट्र पर्यटनाचा प्रचार

- राज्यातल्या बौद्ध केंद्रांची माहिती देण्यासाठी टोकियोमध्ये रोड शो

- गुंतवणुकीसाठी जपानी बँकांबरोबर एमओयूंवर सह्या

- गुंतवणूक आणण्यासाठी जपानी उद्योजकांसोबत चर्चा

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 8, 2015 08:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close