S M L

तीर्थक्षेत्र भगवानगडानं घेतली तीन दुष्काळी गावं दत्तक

Sachin Salve | Updated On: Sep 8, 2015 11:14 PM IST

तीर्थक्षेत्र भगवानगडानं घेतली तीन दुष्काळी गावं दत्तक

08 सप्टेंबर : दुष्काळग्रस्तांसाठी तीर्थक्षेत्र भगवानगडाने मदतीचा हात पुढे केलाय. तीर्थक्षेत्र भगवानगड तीन दुष्काळी गावं दत्तक घेणार आहे. भगवानगडाचे सचिव, महाराष्ट्र पत्रकारसंघाचे अध्यक्ष गोविंद घोळवे यांनी ही माहिती दिलीय.

दुष्काळी भागातील भारदवाडी, बडेवाडी आणि भगवानगड तांडा ही तीन गावं दत्तक घेतली जाणार आहेत. गावातील मुलांच्या शिक्षणाचा खर्च, गरीब शेतकरी, मजुरांना अन्नधान्य आणि पाणी पुरवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. राज्यातल्या इतर मंदिर संस्थानांनीही पुढे येण्याचं आणि दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात देण्याचं आवाहन करण्यात आलंय. दरम्यान, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सभापती आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी ही दुष्काळग्रस्तांना मदत करण्याची तयारी दर्शवलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 8, 2015 11:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close