S M L

मांसबंदीचा निर्णय भाजपच्या अंगलट, सत्ता धोक्यात ?

Sachin Salve | Updated On: Sep 9, 2015 05:50 PM IST

मांसबंदीचा निर्णय भाजपच्या अंगलट, सत्ता धोक्यात ?

09 सप्टेंबर : मांसबंदी प्रकरण आता चांगलंच तापलं असून मीरा भाईंदर महापालिकेत सत्ताधारी भाजप अडचणीत येण्याची शक्यता आहे. पर्युषण काळात मांसबंदी घालण्यात आली आहे. या निर्णयाला शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी विरोध केलाय. आयबीएन लोकमतला सूत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नगरसेवकांची गुप्त बैठक झाली. आणि या बैठकीत सत्ताधारी भाजपच्या विरोधात अविश्वास ठराव आणन्यावर एकमत झालंय.

येत्या ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात महापालिका सभागृहात या संदर्भात ठराव आणणार असल्याची माहिती सूत्रांकडुन मिळतेय. त्यामुळे मीरा भाईंदर महापालिकेतील भाजपची सत्तेला धोका निर्माण झालांय. मीरा भाईंदर महानगर पालिकेच्या महापौर गीता जैन यांच्या विरोधात शिवसेना अविश्वास ठराव आण्याची शक्यता आहे असं सूत्रांकडून माहिती मिळत आहे. शिवसेनेचे काही नगरसेवकांनी अशी मागणी शिवसेना नेत्यांकडे केली आहे.जैन धर्माच्या उपसाच्या वेळी मांसबंदी प्रकरणात भाजप एकटी पडली आहे. गीता जैन या

जैन असल्यामुळे असा निर्णय त्यांनी घेतला असा निर्णय घेतला असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. महापूर गीता जैन यांनी जैन धर्मगुरूंची बैठक बोलावली आहे. याचा शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी विरोध केला आहे.

मांसबंदीचं राजकारण

भाजपच्या सत्तेला धोका

भाजप - 30

शिवसेना - 16

राष्ट्रवादी काँग्रेस - 26

काँग्रेस - 17

बहुजन विकास आघाडी - 3

अपक्ष - 1

भाजपच्या सत्तेला धोका

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी मिळून - 43

भाजपच्या जागा - 30

बहुजन विकास आघाडीचा विरोध

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 9, 2015 05:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close