S M L

देव आनंद यांच्या हस्ते 8व्या पुणे फिल्म फेस्टिव्हलचं उद्घाटन

1 जानेवारी8व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचं उद्घाटन देव आनंद यांच्या हस्ते होणार आहे तर पंडित शिवकुमार शर्मा हे उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे असतील. राजेश खन्ना आणि डॉ. श्रीराम लागू यांना या महोत्सवात 'जीवनगौरव' पुरस्कार देण्यात येणार आहे. 7 ते 14 जानेवारी दरम्यान हा फेस्टिव्हल पुण्यात रंगणार आहे. जागतिक सिनेमा, मराठी सिनेमा आणि विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या फिल्म्स अशा 3 विभागात एक स्पर्धा होणार असून इंटरनॅशनल ज्युरी या स्पर्धांचं परीक्षण करणार आहेत. जागतिक फिल्म विभागात 15 फिल्म्स तर मराठी फिल्म्स विभागात 7 फिल्म्सचा समावेश करण्यात आला आहे. या वर्षीपासून पुणे फिल्म फेस्टिव्हल हा महाराष्ट्राचा अधिकृत फिल्म फेस्टिव्हल म्हणून आयोजित केला जाणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 1, 2010 12:11 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 1, 2010 12:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close