S M L

मीरा भाईंदर पालिकेवर बहुजन आघाडीचा तंदुर मोर्चा

Sachin Salve | Updated On: Sep 9, 2015 08:38 PM IST

मीरा भाईंदर पालिकेवर बहुजन आघाडीचा तंदुर मोर्चा

09 सप्टेंबर : मीरा भाईंदरमध्ये मांस बंदीचे वातावरण अधिकच तापत चाललंय. या सर्व प्रकरणात आता बहुजन विकास आघाडीने उडी घेतली आहे. मीरा-भाईंदरमध्ये 8 दिवस मांस बंदीच्या विरोधात बहुजन विकास आघाडी पालिकेच्या विरोधात तंदुरी मोर्चा काढून या निर्णयाचा विरोध केला.

यात महापौरांच्या दालनात प्रवेश करताना बहुजन विकास आघाडी कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात धक्काबुक्की झाली. बहुजन विकास आघाडी कार्यकर्त्यानी महापालिकेच्या गेट समोर भट्टी पेटून तंदुरी बनवली.

या कार्यकार्त्यांना महापालिकेच्या गेट च्या आत येऊ दिले नाही. एका विशिष्ठ समाजासाठी मांस बंदी करणे चुकीचे आहे. मीरा भाईंदरमध्ये सर्व समाजाचे लोक गुण्या गोविंदाने राहतात. केवळ मताच्या राजकानासाठी हा निर्णय भाजप ने घेतला आहे असा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 9, 2015 08:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close