S M L

मांसविक्री बंदीच्या विरोधात शिवसेना आणि मनसे आक्रमक

Samruddha Bhambure | Updated On: Sep 10, 2015 02:12 PM IST

मांसविक्री बंदीच्या विरोधात शिवसेना आणि मनसे आक्रमक

10 सप्टेंबर : जैनांच्या पर्युषण पर्वात मांसविक्रीवर बंदी आणण्याचा मुद्दा आता चांगलाच पेटला आहे. या मांसविक्रीबंदीच्या विरोधात शिवसेना आणि मनसेने आज मुंबईत जोरदार आंदोलन केलं.

पर्युषण काळात मांसविक्री बंदीचा वाद चांगलाच चिघळला असून याविरोधात मनसेनेही आक्रमक पवित्रा घेत मांसविक्रीवरील बंदी मागे घेण्याची मागणी केली.

मनसेचे नेते संदीप देशपांडेंच्या नेतृत्वाखाली आज दादर इथल्या आगर बाजारमध्ये मासे - मटन विक्रीचा स्टॉल लावला होता. मात्र हा स्टॉल अनधिकृत असल्याचं सांगत पोलिसांना कारवाईचा प्रयत्न केल्याने पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. दरम्यान, यावेळी पोलिसांनी हा स्टॉल उचलत संदीप देशपांडेंसह काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 10, 2015 01:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close