S M L

जपानमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण

Sachin Salve | Updated On: Sep 10, 2015 06:53 PM IST

जपानमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण

10 सप्टेंबर : जपानमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलंय. कोयासान विद्यापीठाच्या परिसरात हा पुर्णाकृती पुतळा बसवण्यात आलाय.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वाकायामा प्रांताचे राज्यपाल शिनाबु निकासा, रिपाइंचे नेते रामदास आठवले, उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते. या भागात प्राचीन कोयासान टेम्पल आहे, त्याला 1200 वर्ष पूर्ण झालेत. महाराष्ट्र पर्यटन खात्याने हा पुतळा उभारला आहे. महत्वाच म्हणजे ब्रॉन्जचा हा पुतळा रत्नागिरीच्या कुडाळमध्ये तयार करण्यात आलाय.

यावेळी कोयासान विद्यापीठ आणि डॉ.बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठात एक करार झाला असून, या कराराद्वारे कोयासान विद्यापीठात पाली, संस्कृतचा अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल तर वाकायमा प्रांत आपलं एक कार्यालय औरंगाबादमध्ये स्थापन करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 10, 2015 06:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close