S M L

दुष्काळग्रस्तांची क्रुर थट्टा, चक्क गढूळ पाणीपुरवठा !

Sachin Salve | Updated On: Sep 10, 2015 10:32 PM IST

दुष्काळग्रस्तांची क्रुर थट्टा, चक्क गढूळ पाणीपुरवठा !

10 सप्टेंबर : मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर होत चाललीये. हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावं लागत आहे. पण परभणीमध्ये दुष्काळग्रस्तांना गढूळ पाणीपुरवठा करून प्रशासनाने क्रुर थट्टाच केलीये. गावकर्‍यांनी हे पाणी घेण्यास नकार दिलाय.

परभणी जिल्ह्यात प्रशासनाकडून एकूण 24 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय हा पाणी पुरवठा कसा होतो याचा शोध आयबीएन-लोकमतने केला. तालुक्यात नाईक तांडा या गावात टँकरद्वारे गढुळ पाणी पुरवठा केला जात असल्याची बाब समोर आलीये. पाणी पुरवठा करणार्‍या या टँकर मधून पाणी सोडण्यात आले ते पाहून सगळ्यांना धक्काच बसला. हे पाणी एवढं दुषित होत की गावकर्‍यांनी ते घ्यायला नकार दिला.अक्षरशः कुठल्या तरी नाल्यातले पाणी पुरवठा करण्यात आलाय.. गावकर्‍यांनीही पाणी खाली सोडून दिलं. टँकर आणणार्‍या व्यक्तीशी आम्ही बोलायचा प्रयत्न केला मात्र त्याने पळ काढला. जिल्हा प्रशासन खरंच ग्रामीण जनतेला असे पाणी देवून आरोग्याशी खेळतंय का असा प्रश्न निर्माण झालाय.

आयबीएन लोकमतचे सवाल

- गढूळ पाणी पुरवणार्‍यावर कारवाई होणार का?

- दुष्काळग्रस्तांना पाणी पुरवण्यात पण घोटाळा होतोय का?

- ही घटना समोर आली अशा अनेक घटना होत असतील ?

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 10, 2015 10:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close