S M L

पुण्यात रिक्षा बंद

2 जानेवारी बाबा आढाव यांच्यासह 200 रिक्षाचालकांना जो पर्यंत सोडण्यात येत नाही. तोपर्यंत रिक्षा बंद ठेवण्याचा निर्धार पुण्यातील रिक्षा संघटनांनी केला आहे. पुण्यात रिक्षा चालकांना गणवेश सक्ती विरोधात रिक्षा पंचायतीने एका मोर्चाचं आयोजन केलं होतं. पण हा मोर्चा निघण्याआधीच बाबा आढाव यांच्यासह दोनशे रिक्षा चालकांना अटक करण्यात आली. त्यामुळे रिक्षा चालकांनी हा संप पुकारला आहे. पुण्यात शनिवारपासून रिक्षा चालकांना गणवेश सक्ती लागू करण्यात आली आहे. पण या सक्तीला रिक्षा पंचायतीचा विरोध आहे. यासह रिक्षा व्यवसायाला सामाजिक सेवेचा दर्जा देणे, रिक्षा भाडे कपात रद्द करणं अश्या अनेक मागण्यांसाठी रिक्षा पंचायतीने मोर्चाचं आयेजन केलं होतं. मात्र बाबा आढाव यांना अटक झाल्याने रिक्षा चालकांनी बंदच हत्यार उपसलं आहे. त्यामुळे पुणेकरांना बस आणि खासगी गाड्यांचा आधार घ्यावा लागतोय. या बंदमध्ये टेम्पोचालकही सहभागी झाले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 2, 2010 12:25 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 2, 2010 12:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close