S M L

चेन्नई एक्स्प्रेसमुळे अंबरनाथमध्ये प्रवाशांचे रेलरोको

Samruddha Bhambure | Updated On: Sep 11, 2015 02:28 PM IST

चेन्नई एक्स्प्रेसमुळे अंबरनाथमध्ये प्रवाशांचे रेलरोको

11 सप्टेंबर : लांबपल्यांच्या गाड्या, मालगाड्यांचा फटका अनेकदा मुंबई लोकल्सना बसतो, त्यामुळे प्रवाशांचे देखील हाल होतं असतात. त्याचाच अनुभव आज अंबरनाथहून प्रवास करताना प्रवाशांना आल्याने संतप्त प्रवाशांनी उत्स्फुर्त रेलरोको आंदोलन केलं. त्यामुळे रेल्वेवरून धावणार्‍या गाड्या काही काळ उशिराने धावत होत्या.

आज शुक्रवारी सकाळी अंबरनाथमध्ये स्टेशनच्या अलीकडे मुंबईच्या दिशेनं जाणार्‍या चेन्नई एक्स्प्रेसला खूप वेळ सायडिंगला उभं केलं होतं. त्यामुळे मागून येणार्‍या लोकलला उशीर झाल्याने संतापलेल्या प्रवाशांना उत्स्फूर्तपणे रेलरोको आंदोलन केलं. पण याचा परिणान भोगावा लागला कर्जत, बदलापूर आणि अंबरनाथकडून मुंबईच्या दिशेने जाणार्‍या प्रवाशांना झाला. ऐन गर्दीच्या वेळी ही प्रकार झाल्यानं चाकारमान्यांचे खूपच हाल झाले. अर्ध्या तासानंतर रेल्वे पोलिसांनी या प्रवाशांची समजूत काढली, आणि प्रवाशांना हटवलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 11, 2015 11:20 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close